आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीतील मंडपाच्या खुंटीने जलवाहिनीला लागली गळती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी गळती होत असल्याची ओरड नेहमीच होत असते. परंतु लग्न समारंभामुळे मंडप उभारण्यासाठी खुंटी ठोकल्यामुळे पाणीगळती सुरू झाल्याची घटना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली. यामुळे तासभरापेक्षा जास्त वेळ पाणी वाहत होते.

पालिकेच्या बेफिकिरीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याची ओरड होत असते. परंतु नागरिकांच्या निष्काळजीपणामुळेसुद्धा पाणी वाया जाण्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. पंचमुखी हनुमान मंदिराच्या पुढे पद्मावती मंगल कार्यालयाच्या अलीकडे पाणीपुरवठय़ाच्या नियोजनादरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात पाणीगळती सुरूहोती. यामुळे मोकळ्या प्लॉटला नाल्याचे स्वरूप आले होते. हजारो लिटर पाणी वाहून जात होते. व्हॉल्व्हमनने तपास केला असता कोणीतरी मंडप ठोकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खुंटी ठोकल्यामुळे पाइप फुटल्याने पाण्याची नासाडी झाली.

पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सहा इंची उपजलवाहिनी आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर कोणीतरी मंडप उभारण्यासाठी खुंटी ठोकल्यामुळे पाइप फुटला आहे. पाणीपुरवठय़ाच्या वेळी ते लक्षात आले. यामुळे काही घरांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सुमारे दीड तास पाणी वाहत होते. पुरवठा बंद झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. गोपाल लुले, कनिष्ठ अभियंता, महापालिका