आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन लाख रुपयांचा माल मोबाइल गॅलरीतून लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोंबडी बाजारातील नोकिया मोबाइल गॅलरी हे दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे मोबाइल हॅण्डसेट व 18 हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.

कोंबडी बाजाराच्या कोपर्‍यावर नव्याने सुरू झालेले नोकिया मोबाइल प्रायोरिटी नावाचे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. नदीम मलिक शुक्रवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले. त्यांनी 18 हजार रुपये ड्रॉवरमध्येच राहू दिले. शनिवारी सकाळी नऊ वाजता कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आला असता, त्याला दुकानातील मोबाइल इतरत्र फेकलेले आढळून आले.

दुकानाच्या मागील बाजूच्या खिडकीच्या व्हेंटिलेटरमधून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. कटरच्या साह्याने मागील दरवाजा कापलेला आढळून आला. दुकानातील दोन लाख रुपयांचे नोकिया कंपनीचे मोबाइल हॅण्डसेट व ड्रॉवरमध्ये ठेवलेली 18 हजारांची रोकड देखील चोरट्यांनी लंपास केली आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी आलेल्या गौरी नामक श्वानाने फक्त दुकानाच्या अवतीभोवती फिरून मार्ग दाखविला.