आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Legislative Council,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेसाठी शिवसेना पदाधिकार्‍यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरवण्यासंदर्भात गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. शुक्रवारी यासंदर्भात पुन्हा भेट घेऊन सविस्तर विषय मांडण्यासाठी मुंबईत थांबल्याची माहिती जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांनी दिली.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. गुरुवारी कार्यक्रम आटोपल्यानंतर उपनेते गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख किशोर पाटील, चंद्रकांत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीचा विषय त्यांच्या कानावर टाकण्यात आला. सेनेचे 150 मतदान असल्याने विजयासाठी प्रयत्‍न करता येईल, असेही ठाकरेंना सांगण्यात आले. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पाटील यांनी दिली; यासाठीच आपण मुंबईला मुक्कामी थांबल्याचेही किशोर पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलतांना सांगितले.