आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव लोकसभा मतदारसंघ देवकरांसाठीच अनुकूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मुंबईचं मंत्रालय सोडून दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नसली तरी गुलाबराव देवकरांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जळगाव लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक अनुकूल आहे. त्यामुळेच पक्षाध्यक्षांकडून त्यांनाच ही निवडणूक लढवावी लागणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणायचे असतील तर आपल्याला उमेदवार म्हणून एकाच मतदारसंघात अडकून राहाणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद देवकरांनी लोकसभेची उमेदवारी टाळण्यासाठी केला आहे. मात्र, रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मानसिकता पक्षात असल्याने केवळ जळगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचे आहे, ही पक्षर्शेष्ठींची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर देवकरांना उमेदवारी नाकारण्यासाठी ठोस मुद्दाही राहिलेला नाही.

सर्वात प्रबळ उमेदवार
लोकसभा निवडणूक लढवायला देवकरांची तयारी नसली तरी काही नेते मात्र तयार आहेत. मात्र, अनुकूलतेचा विचार करता देवकर हेच विजयाची शक्यता असलेले सर्वात प्रबळ उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे त्यांनाच ही निवडणूक लढवावी लागेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे. देवकरांशिवाय विचार झाल्यास अमळनेरचे साहेबराव पाटील पर्याय असू शकतात.


देवकरांचे अधिक-उणे
अधिक- 0 जळगाव ग्रामीण मतदारसंघात केलेल्या कामांचा लाभ होईल.
0 जळगाव शहरातही अनेक वर्षांपासून नगरसेवक आणि अन्य पदांवर काम केल्यामुळे संपर्क
0 चाळीसगाव तालुका हा त्यांचा तालुका आहे. तिथे त्यांचे बरेच नाते-गोते आहे.
0 दिल्लीत ‘जाणार’ असल्याने त्यासाठी पारोळय़ातील पक्षांतर्गत विरोधकांकडून मदतच होऊ शकते.
0 अजित पवारांनी जबाबदारी सोपवली तर साहेबराव पाटलांकडून अमळनेरमधून मोठी मदत होऊ शकते.
0 देवकरांचे इतर पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध असल्याने विरोधीपक्षाकडूनही छुपी मदत शक्य.