आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Mahapalika Commissioner Ambar Light Issue

जळगाव महापालिका आयुक्तांनी काढला ‘अंबर’ दिवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गृह विभागाच्या अधिसुचनेनुसार पालिकेच्या महापौर व आयुक्तांना ‘अंबर’ दिवा वापरता येणार नसल्याचे स्पष्ट होताच गुरुवारी पालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी त्यांच्या वाहनावरील दिवा काढून घेतला आहे.

राज्याच्या गृह विभागाने कोणाच्या वाहनावर लाल व अंबर दिवा लावण्यास परवानगी आहे याची यादीच जाहीर केली होती. त्यात ‘क’ व ‘ड’ महापालिकेच्या महापौरांना लालदिवा तसेच आयुक्तांना अंबर दिवा लावण्यासंदर्भात कोणताच उल्लेख नाही. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शासन आदेशाची माहिती घेऊन आपल्या वाहनावरील अंबर दिवा काढून टाकण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आयुक्तांच्या वाहनावरील दिवा सायंकाळी काढून घेण्यात आला. आदेशाची अंमलबजावणी करण्यात आघाडी घेतलेल्या आयुक्तांनतर शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.