आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविकेने उगारली अधिकाऱ्यावर चप्पल, जळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गाेंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नगररचना विभागातून निलंबित करण्यात अालेल्या सहा रचना साहाय्यकांनी सभागृहाच्या निर्णयावर अाक्षेप घेऊन अाराेपांच्या फैरी झाडल्या हाेत्या. सहायक संचालक चंद्रकांत निकम यांचीच त्यांना फूस हाेती, असा अाराेप करत जळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी चांगलाच गाेंधळ उडाला. दरम्यान, मनसेच्या एका नगरसेविकेने तर निकम यांच्या दिशेने चप्पल उगारली.

दरम्यान, या सहाही रचना सहायकांच्या निलंबनावर महासभेत शिक्कामाेर्तब करून त्यांना कधीच नगररचना िवभागात िनयुक्ती न देण्याचा तसेच त्यांच्या सेवा पुस्तिकेत तशी नाेंद घेण्याचा ठराव मंजूर करण्यात अाला. महासभेने केलेल्या िनलंबनाच्या ठरावाला शह देण्यासाठी अापल्याच अधिकाऱ्यांकडून िनवेदन देऊन प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र घेतलेले नगररचना िवभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्यासाठी बुधवारची महासभा फारच त्रासदायक ठरली. अायुक्तांना िदलेल्या निवेदनावर सही केलेल्या अधिकाऱ्यांना निकम यांच्या सांगण्यावरूनच हा प्रकार केल्याचे सांगितल्याने निकमांची बाेलती बंद झाली. त्यावर ‘मी माझा खुलासा शासनाकडे पाठवला अाहे’ एवढेच ते सांगत हाेते.

मनसेच्या नगरसेविका पार्वताबाई भिल यांनी निकम यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘हे अधिकारी नगरसेवकांना मानपान देत नाहीत. त्यांना साेडायचे नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ असे सांगत भिल यांनी निकम यांना मारण्यासाठी थेट चप्पल उगारली. या वेळी मनसेच्या सर्व नगरसेविका जागेवर उभ्या राहिल्या. त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला.

शासनाकडे म्हणणे मांडणार
निकम यांना तातडीने बडतर्फ करावे, त्यांच्या कार्यकाळातील परवानग्यांची चाैकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. परंतु अाजच निकम यांना कार्यमुक्त केल्यास अडचणी येऊ शकतात. पालिकेत पर्यायी व्यवस्था नाही. शासनाच्या नगररचना िवभागातही अधिकारी नाही. त्यामुळे २ राेजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून तातडीने व्यवस्था करण्याची िवनंती करण्याचे अायुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्याचे अाश्वासनही दिले.

अधिकाऱ्यांची एकजूट
निकमांवर चप्पल उगारल्याची घटना घडल्यानंतर काही वेळानंतर उपायुक्त अविनाश गांगाेडे, प्रदीप जगताप, शहर अभियंता सी.जी.पाटील, िवशेष लेखा परीक्षक एस.बी.भाेर हे सभागृहातून जाण्याच्या तयारीत हाेते. परंतु महापाैरांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले.