आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये कोण ठरणार किंगमेकर मनसे की राष्ट्रवादी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीचे निकाल हाती आले असून त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. 37 प्रभागातील 75 जागापैकी खान्‍देश विकास आघाडीने सर्वाधिक 32 जागा जिंकल्‍या आहेत. त्‍यानंतर भाजपने 16 आणि मनसेने 12 जागांवर विजय मिळविला आहे. त्‍यामुळे एकूण निकालाचे आतापर्यंतचे चित्र पाहता कोणत्‍याच पक्षाला स्‍पष्‍ट बहुमत मिळालेले नाही. खान्देश विकास आघाडीला सत्ता कायम राखण्‍यासाठी मनसे अथवा राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागणार हे मात्र निश्चित आहे. सत्तास्थापनेसाठी 38 जागांची गरज आहे. यामुळे जळगावात किंगमेकर कोण ठरणार? याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

'घरकुल' गैरव्यवहारप्रकरणी आमदार सुरेश जैनसह त्यांचे समर्थक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तरी देखील खान्देश विकास आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवरील सत्ता सहजासहजी सोडणार नाही. महापालिकेत सत्ता पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी आघाडीसमोर दोन पर्याय शिल्लक आहेत. त्यापैकी एक म्हणजे मनसेला सोबत घेण्याचा आहे. तर दुसरा म्हणजे राष्ट्रवादीला सोबत घेवू शकते.

परंतु, दुसरीकडे खान्देश विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी व मनसे एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पक्षनिहाय विजयी जागा पुढील प्रमाणे
खान्‍देश विकास आघाडी - 32
भाजप- 16
राष्‍ट्रवादी कॉंग्रेस-11
मनसे- 12
अपक्ष- 1
जनक्रांती आघाडी- 2
महानगर विकास आघाडी- 1

पुढील स्लाईड्‍सवर वाचा प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची नावे