आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्बो प्रचार रॅलीमुळे हाल; अखेरच्या दिवशी कोट्यवधींची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘अभी नही तो कभी नही’ या उक्तीचा योग्य अर्थ काढत नगरसेवक होण्याची मनीषा बाळगलेल्या सर्व आघाड्या व राजकीय पक्षांतील उमेदवारांनी प्रचाराचा शेवटचा दिवस शक्तिप्रदर्शन करून दणाणून सोडला. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसला. ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत नागरिकांना काय त्रास होतोय याचे साधे भानही नव्हते. त्यामुळे प्रचाराचा शेवटचा दिवस वायू, ध्वनिप्रदूषण व ट्रॅफिक जामच्या भेटीने संपला. शेवटच्या दिवसात सुमारे 70 पेक्षा अधिक लहान मोठ्या रॅली निघाल्या.

महापालिका निवडणुकीसाठी 48 तास अगोदर जाहीर प्रचार थांबवावा लागणार असल्याने गेल्या 14 दिवसांपासून प्रचारात गुंतलेल्या 405 उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत ताकद पणाला लावली होती. सकाळी 10 वाजेनंतर गल्लोगल्ली हिंडणाºया रिक्षा शेवटच्या दिवशी सकाळी 7 वाजता प्रचार कामाला लागल्या होत्या. प्रचार रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करायचे असल्याने शहरात मजुरांची कमतरता भासतेय म्हणून आजूबाजूच्या गावांमधून रिक्षा भरून लोकांना आणण्यात आले होते. ढोल ताशे, बॅण्ड, चार चाकी वाहनांच्या ताफ्यात तसेच उमेदवाराच्या जयघोषात ऐटीत चालणाºया रॅलींमुळे दिवसभरात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प केली होती. रॅलींचा वेळ निश्चित नसल्याने पोलिसांनाही नियंत्रण ठेवणे अवघड झाले.

डेंजर झोनचा अनुभव
गोलाणी मार्केट परिसरातून दिवसभरात गेलेल्या रॅलींमुळे हनुमान मंदिराजवळ तर अर्ध्या तासापर्यंत वाहतूक ठप्प झाली. यामुळे पेट्रोल व डिझेलची नासाडी सोबत धुराचे प्रदूषण त्यात वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे हा परिसर काही वेळ ‘डेंजर झोन’मध्ये गणला जाऊ लागला होता.

अखेरच्या दिवशी कोट्यवधींची उलाढाल
शेवटचा दिवस असल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून ताकद दाखविण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मतदारांवर आपल्या मागे असलेल्या पाठबळाचा प्रभाव टाकण्यासाठी बºयाच ठिकाणी भाड्याने प्रचारक आणल्याचे सांगितले जात होते. शहरात सुमारे 75 पेक्षा जास्त
रॅली निघाल्या.

यात प्रत्येकी 150 ते 400 जणांचा सहभाग दिसून आला. त्यामुळे 75 रॅलीमध्ये किमान 3 हजार लोकांना दिवसभराच्या प्रचारासाठी अडीचशे ते 300 रुपये अदा केल्याचे जाणकारांचे मत आहे. त्याचप्रमाणे वाहनांचा खर्च, ढोल ताशे, फलक, झेंडे, नाश्ता यातून सुमारे दीड कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाल्याचा दावा राजकीय विश्लेषकांचा आहे.

उमेदवारांनी वेधले लक्ष
रॅलीवेळी शुक्रवारी प्रत्येक उमेदवाराने आपली रॅली मोठी दिसावी, यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यासाठी प्रचंड वाहनांचा ताफा मागवण्यात आला होता. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.