आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेच्या घंटागाड्यांच्या रीडिंगची संगणकीकृत नोंदणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कचरा संकलनासाठी पालिकेतर्फे घंटागाड्यांची सेवा पुरवली जाते. पूर्ण काम न करताच गाड्या लावून देण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रत्येक घंटागाड्यांची बारकाईने नोंद घेतली जाणार आहे. संकलनासाठी निघताना व परत आल्यावर त्यांचे किलोमीटरचे रीडिंग आणि वेळेची संगणकीकृत नोंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

प्रत्येक घंटागाडीकडून घरोघरी जाऊन सरासरी 15 ते 20 किलोमीटर फिरून कचरा संकलन करणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्ष वॉर्डात कमी फेर्‍या मारून लवकर वाहने जमा करण्याचे प्रकार वाढले होते. आयुक्तांनी केलेल्या पाहणीत गाड्या जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर 19 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढे घंटागाडी शिवाजीनगरातून निघताना संगणकात किलो मीटर रीडिंग, वेळेची नोंद केली जाईल. यापूर्वी सर्व गाड्यांचे मीटर दुरुस्त करून दिले जाणार असून ज्या गाड्यांचे मीटर बंद होईल त्या चालकांवर जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहन विभाग प्रमुख एस.जे.बोरोले यांना सूचना देण्यात आल्या आहेत.