जळगाव - महापालिकेत शुक्रवार सन्नाट्याचादिवस ठरला. अगदी तीनविभागप्रमुख वगळता एकही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने सतरा मजली कर्मचाऱ्यांच्या ताब्यात हाेती. अधिकारी रजेवर तसेच टूरवर हाेते. तर साहेब नसल्याने कर्मचारीसुद्धा भुर्रर्र झाले हाेते.
सकाळी १५ व्या मजल्यापासून ते चाैथ्या मजल्यावरील अधिकाऱ्यांमध्ये अगदी बाेटावर माेजण्याइतकेच अधिकारी दालनात उपस्थित दिसले. अायुक्त संजय कापडणीस हे कार्यशाळेसाठी नाशिकला गेले अाहेत. तर नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम उपायुक्त प्रदीप जगताप हे अाैरंगाबादला तर उपायुक्त अविनाश गांगाेडे रजेवर हाेते. तसेच अास्थापनाविभागाचे प्रमुख डी.अार. पाटील रजेवर,विशेष लेखापरीक्षक एस.बी.भाेर रजेवर हाेते.वित्त अधिकारी चंद्रकांत खरात दुपारपासून बाहेरगावी गेले. प्रकल्प प्रमुख अ. वा. जाधव, पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके, उपशहर अभियंता सुनील भाेळे हे सकाळी कार्यालयात हजर हाेते. तर इतर अधिकारी पदाधिकारी सकाळपासून गायब हाेते. मिळालेल्या माहितीनुसार पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी नाशिकला अायाेजित समारंभासाठी गेल्याचे सांगितले गेले. याचा परिणाम म्हणजे अधिकारीच नसल्याने कर्मचाऱ्यांनीही टेन्शन घेता माेकळीकमिळाल्याचा फायदा घेतला.