आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यात महिलेच्या खून प्रकरणी एकास जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखराम भिल - Divya Marathi
सुखराम भिल
अमळनेर - पारोळ्यातील सुखराम भिल याला जिल्हा न्यायालयाने खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने शेतात एका महिलेचा खून केला होता. 
 
याबाबत अधिक माहिती अशी, की 25 नोव्हेंबर 2015 रोजी सुमनबाई गुलाब भिल ही तिच्या शेतात काम करत होती. त्याचवेळी दुपारी 2 च्या सुमारास सुखराम भिल हा हातात लाकडी माचा घेऊन जाताना धनराज पाटील यांना दिसून आला. थोडया वेळातच सुमनबाईच्या शेतात आरडाओरडचा आवाज आल्याने धनराज पाटीलने पुन्हा शेतात धाव घेतली. सुखराम हातातील लाकडी माच्याने सुमनबाईला मारत होता. तसेच सुमनबाईच्या छातीवर गुडघे टेकून तिचा गळा आवळत होता. धनराज शेतात आल्याचे बघताच सुखराम लाकडी माचा फेकून घटनास्थळावरून पसार झाला.

धनराजने सरपंच व शेतकऱ्यांना वेळीच बोलावले आणि यांना बोलावले. मात्र, तोपर्यंत सुमनबाईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांना बोलावून सुमनबाईचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. धनराज पाटील याच्या फिर्यादीवरून सुखराम विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यात धनराज पाटील व डॉ सुरेश पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आरोपीस जन्मठेपची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
बातम्या आणखी आहेत...