आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉटन मार्केट स्थिरावले; कापसाचे भाव 4100 रुपये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वधारलेले कापसाचे भाव दुस-या आठवड्यात स्थिरावले आहेत. जागतिक बाजारपेठेत कापसाच्या गाठींचे भाव वाढल्यानंतर कापसाचे भावदेखील वाढले होते. कापसाची सर्वाधिक मागणी असलेल्या गुजरातमध्ये मकर संक्रांतीमुळे जिनिंग उद्योगाला काहीसा ब्रेक लागल्याने या आठवड्यात भाव स्थिर राहिले. पुढील आठवड्यात त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्टÑीय बाजारपेठेतील घडामोडी आणि राज्यात झालेले कापूस आंदोलन यामुळे या वर्षी कापसाचा हंगाम काहीसा लांबला आहे. भावाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतक-यांना डिसेंबर उलटूनही भाव मिळत नसल्याने उशिरा कापूस विक्री सुरू झाली. जानेवारीत भावात सुधारणा झाली असून सध्या बाजार स्थिर आहे.
सध्या गाठीचे भाव 34 ते 35 हजारांवर आहेत. खुल्या बाजारात कापसाचे भाव चार हजार ते 4100 रुपयांपर्यंत आहेत. दोन दिवसात भावात 100 रुपयांनी घसरण झाली. मकर संक्रांतीमुळे गुजरातमध्ये जाणाºया कापसाच्या गाड्या खाली होत नसल्याने भाव स्थिर आहेत. पुढील आठवड्यात भावामध्ये सुधारणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चीनकडून कापूस आयातीची शक्यता असल्याने जिनिंग उद्योगाने उत्पादन वाढवले आहे. निर्यात सुरू झाल्यास कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे.