आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: समतानगरात विवाहितेची गळफास घेऊन अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- समतानगरातील विवाहितेने मंगळवारी दुपारी १.३० वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद केली अाहे. हेमराज पवार हे समतानगरात पत्नी सरिता (वय ३०), मुलगा रुद्र (वय ४) मुलगी विधी (वय ९) यांच्यासोबत राहतात. हेमराज हे पेंटर म्हणून काम करतात. शाळेला सुट्या लागल्यामुळे दोन्ही मुले अमळनेर येथे मामाकडे गेले आहेत. मंगळवारी हेमराज हे सकाळीच बी. जे. मार्केटमधील दुकानात रंग घेण्यासाठी निघून गेले. त्यामुळे सरिता एकट्याच घरी होत्या. हेमराज यांनी दुपारी १.३० वाजता पत्नी सरिताला फोन केला. मात्र, बराचवेळपर्यंत फोन उचलला नाही. अखेर त्यांनी घराशेजारीच राहणारी त्यांची मेहुणी रेणुका शांताराम गावंडे हिला फोन करून सरिताला फोन उचलायला सांग, असे सांगितले. त्यामुळे रेणुका बहिणीच्या घरी गेली असता, सरिताने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिने आरडाओरड केली. नंतर हेमराज यांना कळवण्यात आले. पत्नीचा मृतदेह पाहिल्यानंतर आक्रोश केला. सिव्हिलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरिता यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. 
बातम्या आणखी आहेत...