आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव मेडिकल काॅलेजसाठी कुसुंब्यातील जागा निश्चित, शिक्षणमंत्री महाजन यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी कुसुंब्यानजीक जागा निश्चित झाली अाहे. त्याच्या कृती आराखड्यासह इतर मंजुरींचे काम प्रगतीवर अाहे. जळगावात एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सुविधा मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार अाहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
जळगावमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, विविध प्रकारच्या लॅबसारख्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार अाहेत. जनतेला चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जळगावात एकाच ठिकाणी सर्व सुविधा देण्याचा संकल्प अाहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रस्ताव, कृती अाराखडे मंजुरीसाठी अाले अाहेत. अाराेग्य विज्ञान विद्यापीठ त्यावर काम करीत अाहे. वेळेत उपचार मिळतील.
राज्यात ११०० लाेकांमागे एक डाॅक्टर अाहे. दुर्गम भागात हे प्रमाण हजारांपर्यंत अाहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कमी असल्यामुळे, डॉक्टरांची संख्या अपुरी अाहे. यामुळे ग्रामीण भागात चांगल्या अाराेग्य सुविधा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, अाता प्रत्येक जिल्ह्यात पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार अाहाेत. त्यामुळे रुग्णांना स्थानिक पातळीवरच चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील, असे महाजन यांनी सांगितले.
नंदुरबारचे मेडिकल काॅलेज कागदावरच
तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कारकीर्दीत मंजूर झालेले नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय कागदावरच आहे. काॅलेजसाठी अाघाडी शासनाच्या काळात सुमारे ४०० कोटींचा निधी मंजूर केला होता. तसेच टोकरतलाव रोडवर ४० एकर जागा पाहिली गेली हाेती; परंतु त्यानंतर काहीच झाले नाही. २०१४-१५ या वर्षी १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू होणे अपेक्षित होते; परंतु काहीच प्रक्रिया नसल्यामुळे नंदुरबारकरांसाठी हे काॅलेज गाजर ठरले आहे.
बातम्या आणखी आहेत...