आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीकडून जादा पाण्याची अपेक्षा फोल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाघूर धरणातील साठा कमी होत असून लवकरच ‘डाऊन स्कीम’चा उपयोग केला जाणार आहे. मात्र, या योजनेतून पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याची कल्पना असतानाही एमआयडीसीकडून अतिरिक्त पाण्यासाठी प्रशासन किंवा पदाधिकार्‍यांकडून गांभीर्याने पावले उचलली जात नसल्याने जादा पाणी मिळण्याची अपेक्षा फोल ठरण्याची वेळ आली आहे.

वाघूर धरणात असलेल्या पाणीसाठय़ातून उपसा करायचा झाल्यास पुढील आठवडा ‘अप स्कीम’मधून पाणी उचल शक्य होणार आहे. त्यानंतर ‘डाऊन स्कीम’चा उपयोग केला जाणार असून तिच्या माध्यमातून दर दिवसाला 30 एमएलडीपर्यंत पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या एमआयडीसीकडून 7 एमएलडी पाणी मिळत असून ते 10 एमएलडीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. उपलब्ध होणार्‍या पाण्यातून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने एमआयडीसीकडून वाढीव पाणी उपलब्ध होणे गरजेचे होते. यासाठी पदाधिकार्‍यांतर्फे कागदोपत्री पाठपुरावा करण्यात आलेला असला तरी त्याला अद्यापही यश आलेले नाही. सहा महिन्यांपूर्वी उद्योगमंत्र्यांसमवेत तत्कालीन महापौर जयर्शी धांडे व पालिका अधिकार्‍यांची बैठक झाली होती. यावेळी 15 एमएलडी पाणी पाहिजे असल्यास मागील थकबाकी देण्याची अट टाकण्यात आली होती. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता थकबाकी देणे शक्य नसल्याची जाणीव असल्याने पाणी मिळवण्यासाठी ठोस प्रय} झाले नसल्याची स्थिती आहे.

18 कर्मचार्‍यांची नियुक्ती
बाष्पीभवनाचा वेग कमी झाल्याने अजून आठवडाभर ‘अप स्कीम’मधून पाणी उपलब्ध होणार असून त्यानंतर याच योजनेचा उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे 18 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांनी तसे त्यांना पत्र दिले आहे.

दोन दिवसांत फेरचाचणी
यापूर्वी पंप आणि पाणीसाठय़ाची चाचणी घेण्यात आली असली तरी ती काही तासांपुरती होती. ‘डाऊन स्कीम’ मधून पाणी द्यायचे झाल्यास 24 तासांची चाचणी घेणे आवश्यक आहे. येत्या दोन दिवसात अशी चाचणी घेण्यात येणार असून त्या दृष्टीने मनुष्यबळ तयार ठेवले आहे. अ.वा.जाधव, विभाग प्रमुख पाणीपुरवठा

सव्वातीन कोटींची थकबाकी
पालिकेने एमआयडीसीकडून यापूर्वी घेतलेल्या पाण्याच्या बिलापोटी 3 कोटी 28 लाख रुपये थकबाकी आहे. अतिरिक्त पाणी हवे असल्यास किमान दीड कोटी रुपये भरण्याच्या सूचना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सहा महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. सद्या सुरूअसलेल्या पाणीपुरवठय़ापोटी पालिका एमआयडीसीला दरमहा 10 लाख देत आहे.

एमआयडीसीकडून सध्या 10 एमएलडी पाणी मंजूर आहे, अजून 5 एमएलडी पाणी उपलब्ध होण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूआहे. नितीन बरडे, सभापती, पाणीपुरवठा

03 कोटी 28 लाख एकूण थकबाकी
06 महिन्यापूर्वी दीड कोटी भरण्याच्या होत्या सूचना
10 लाख दरमहा पाण्यासाठी देते पालिका
07 एमएलडी पाणी मिळतेय एमआयडीसीकडून