आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन खटल्याबाबत 15 दिवसांत घ्या निर्णय- औरंगाबाद खंडपीठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन व पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी देण्याबाबत 15 दिवसांत निर्णय घ्या, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनाला दिले आहेत. खटल्याला परवानगीबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने 12 आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. ती फेटाळत खंडपीठाने हा आदेश दिला.

जैन व देवकर हे लोकसेवक असल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालवण्यासाठी राज्य शासनाची परवानगी गरजेची आहे. या दोघांविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी तपासाधिकार्‍यांनी मागितली आहे. दरम्यान, परवानगीचा अर्ज देऊन एक वर्ष उलटले तरीदेखील शासनाने अद्याप तशी परवानगी दिलेली नसल्यामुळे नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी शासनाविरुद्ध खंडपीठात याचिका दाखल केली होती. आठ आठवड्यांच्या आत परवानगीच्या विषयावर निर्णय घ्यावा, असे आदेश 14 जानेवारी 2013 रोजी दिले होते. खंडपीठाने आदेश देऊनही राज्य शासनाने निर्णय न घेता, उलट परवानगीसाठी 12 आठवड्यांची मुदत मिळावी, असा अर्ज राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता.