आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव ते मुंबई व्हाया पुणे विमानप्रवास शक्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव हे ‘क’ वर्ग शहर अाहे. नागपूर, पुणे ही ‘ब’ वर्ग तर मुंबई ‘अ’वर्ग अाहे. त्यामुळे थेट जळगावातून मुंबई अशी विमानसेेवा सुरू करता येणार नाही. जळगाव-पुणे- मुंबई अशी सेवा हाेऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. देश-विदेशातून येणाऱ्या विमानांमुळे मुंबईमध्ये एअर ट्राफिक अधिक असते. त्यात सकाळच्या वेळेत जळगावातील विमान मुंबईत उतरू शकत नाही.
दुपारी किंवा सायंकाळी वेळ मिळाला, तरी प्रवाशांच्या दृष्टीने ते उपयाेगाचे ठरणार नाही. त्यामुळे मार्ग वेळ या दृष्टीने नियाेजन करा, असे सल्ला पालक सचिव राजेश कुमार यांनी दिला.
जिल्हा दाैऱ्यावर अालेले पालक सचिव राजेश कुमार यांनी शुक्रवारी जळगाव विमानतळाची पाहणी केली. विमानतळ बघितल्यानंतर त्यांनी येथून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
विमानतळावरील सुविधा जागतिक दर्जाच्या असल्याने येथून सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांची उपलब्धता जाणून घेणे अावश्यक अाहे. माेठे उद्याेजक, व्यापारी यांच्याशी चर्चा करून मासिक अाणि वार्षिक किती प्रवाशी मिळू शकतील? याबाबत माहिती घेऊन अहवाल देण्याची सूचना राजेश कुमार यांनी दिली.

अहवालसादर करण्याच्या सूचना

जळगाव विमानतळावरील सर्व सुविधा अद्ययावत अाहेत. येथून विमानसेवा सुरू करण्यास तांत्रिक अडचण येणार नाही. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद कसा अाहे? हे पहावे लागेल. स्थानिक उद्याेजक, व्यापारी अाणि विमानसेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांकडून पोटेन्शिअलबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करावा, अशा सूचना पालक सचिव राजेश कुमार यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिल्या अाहेत.

निर्मल कार्यालय स्पर्धा

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेविषयी स्पर्धा निर्माण करण्यासाठी ‘निर्मल कार्यालय स्पर्धा’ सुरू कराव्यात. शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालय बांधावीत अन्यथा त्या कार्यालयातील पुरुष शौचालयांचे महिला शौचालयांमध्ये रुपांतर करण्याच्या सूचनाही पालक सचिव राजेश कुमार यांनी दिल्या.
ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी आदी कर्मचाऱ्यांनी शौचालये बांधली आणि त्याचा वापर सुरू आहे का? याची खात्री करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. त्यांनी विमानतळ, प्रस्तावित महिला रुग्णालय, पर्यटन, आधार कार्ड, जनधन योजना, गारपिटीने झालेले नुकसान दिलेले साहाय्य आदींचा आढावा घेतला. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
फोटो - विमानतळाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा मार्गदर्शन करताना पालक सचिव राजेश कुमार.