आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Administration News In Marathi

शतपावली, खेळण्यास हक्काची जागा मिळणार, महापालिका प्रशासनाचा जागांचा प्रस्ताव जनहिताचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या महापालिकेकडून माेठ्या याेजनांची अपेक्षा ठेवता संयमाने वागणाऱ्या जळगावकरांच्या मागण्याही किमान अाहेत. त्यापैकी अापल्या घराजवळ गडद छाया देणारे वृक्ष, हिरवळ, लहान मुलाना खेळण्यासाठी खुल्या जागेची किरकाेळ अपेक्षा अाहे.
महापालिका प्रशासनाने यंदाच्या अंदाजपत्रकात अशा जागा ताब्यात घेण्याची तयारी दाखवल्याने जळगावकरांची अर्धी मागणी पूर्ण झाली अाहे. अाता उर्वरित जबाबदारी सत्ताधारी-विराेधकांची अाहे.
६८ चाैरस किलाेमीटर क्षेत्राच्या जळगाव शहराची लाेकसंख्या लाखांपर्यंत असून, दरराेज ५० हजारांपेक्षा जास्त लाेक काही ना काही कामानिमित्त शहरात येत असतात. तसेच दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत चालला असून, जागेची मर्यादा पाहता दूर जाण्याची मानसिकता नसल्याने अाता शहरात उंच इमारतींना प्राधान्य दिले जात अाहे.
यावरून जागेची कमतरता स्पष्ट हाेते. शहराचा गाडा हाकणाऱ्या महापालिकेच्या त्या-त्या भागातील नागरिकांसाठी खुल्या जागा अाहेत. मात्र, या जागांवर सध्या काही सामाजिक संस्था मंडळांची कब्जा करून वर्षाकाठी लाखाे रुपये कमाई सुरू अाहे. त्यामुळे नागरिक अापल्या हक्काच्या जागेपासून वंचित अाहेत. मात्र, अाता प्रशासनाने वाढत्या तक्रारी पाहून वस्तुस्थितीचा अभ्यास करून अातापर्यंत वाटप केलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला अाहे. या जागा नागरिकांसाठी खुल्या हाेणार असल्याने घराजवळ सायंकाळी निवांत बसण्यास मुलांना खेळण्यास जागा उपलब्ध हाेणार अाहे.
अशी अाहे सध्याची स्थिती-
शहरातीलनागरिकांच्या मालकीच्या खुल्या जागांवर एखाद्या कार्यक्रमाच्या अायाेजनासाठी त्यांना हजाराे रुपये माेजावे लागतात. मनपाने स्वस्तात व्यवसाय करण्यासाठी िदलेल्या या जागांचा सामान्य नागरिकांना काेणताही फायदा हाेत नाही. मनपाच्या पाचशेपेक्षा जास्त खुल्या जागा असतानाही जळगावकरांसाठी जाॅगिंग पार्क, वृद्धांसाठी नाना-नानी पार्क, लहान मुलांसाठी खेळणी वा खेळाडूंसाठी शहरात मैदाने नाहीत.
भूमिकेकडे लक्ष?
गेल्याकाही वर्षांत काॅलन्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खुल्या जागा माेकळ्या करण्यासंदर्भात तक्रारी केल्या अाहेत. त्यांची दखल घेऊन मनपा प्रशासनाने त्या जागा ताब्यात घेण्याचे जाहीर केले अाहे. मात्र, हा निर्णय कायद्यात बदलवण्याची जबाबदारी सभागृहाची अाहे. त्यामुळे जनतेच्या हिताबद्दल किती नगरसेवकांना कळकळ अाहे, हे १८ फेब्रुवारीच्या स्थ‌ायी सभेत स्पष्ट हाेईल. या सभेत खाविअा, भाजप, मनसे राष्ट्रवादी हे खुल्या जागांबद्दल काय निर्णय घेतात? याकडे जळगावकरांचे लक्ष लागले अाहे.
कमाईसाठी केला वापर
नगरपालिकामहापालिका सभागृहाने, मग त्यात सत्ताधारी असाे की विराेधक, सर्वांनी गेल्या २५ ते ३० वर्षांत अापल्या मालकीच्या (महापालिका) खुल्या जागा जवळच्या हितचिंतकांना खुश करण्यासाठी ठराव करून दिल्या अाहेत. अाज त्या जागांचा वापर संबंधितांनी कमाईसाठी सुरू केला अाहे. घराजवळील माेक्याच्या जागांवर लग्नकार्य करायचे झाल्यास जळगावकरांना त्यासाठी ३० हजार ते ७० हजारांपर्यंत रक्कम माेजावी लागतेय. हे सर्व उघडपणे हाेत अाहे. तर सत्ताधारी-विराेधक मूग गिळून गप्प अाहेत.