आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका पोटनिवडणुकीची उद्यापासून रणधुमाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या नगरसेवकपदाच्या दोन रिक्त जागांसाठी 23 डिसेंबरपासून रणधुमाळी सुरू होणार आहे. जागा कमी असल्या तरी संख्याबळ वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांकडून तोलामोलाचे उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तर दुसरीकडे आहे त्या पक्षाचे उमेदवार बिनविरोध करवून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेनेही निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने जळगाव महापालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. स्थायी समिती सभापती पदावर विजय संपादन केल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. याचा परिणाम दोन रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळेल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे अल्पमतात आलेल्या खान्देश विकास आघाडीनेही दोन जागा ताब्यात घेऊन संख्याबळ वाढवणार असल्याने तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनीही उमेदवार देणार असल्याचे सांगितले आहे. मनसेतर्फे अद्याप उमेदवार रिंगणात उतरवण्यावर निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.