आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal City In Batharoom Rate Increase

सुलभ शाैचालयात दोन एेवजी पाच रुपये घेऊन लूट, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेसाेबत करार करून फुले मार्केटसह इतर तीन मार्केटमध्ये सुलभ शाैचालयांच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू अाहे. करारानुसार दाेन रुपये अाकारणी करणे गरजेची असताना, प्रत्यक्षात मात्र पाच रुपये घेतले जात अाहेत.
गेल्या सहा वर्षांपासून महापालिका प्रशासनाने याकडे सर्रास दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांची दरराेज अार्थिक पिळवणूक सुरू अाहे. या सर्व प्रकरणाचे अाॅडिट करून मधुर सेवाभावी संस्थेला दिलेला मक्ता रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी अायुक्तांकडे करण्यात अाली अाहे.

उत्पन्नवाढीसाठी जळगावकरांवर कराचा बाेजा टाकणाऱ्या महापालिकेला अापल्याच कर्तव्याचा विसर पडलेला दिसताेय. नागरिकांच्या साेईसाठी महापालिकेच्या जागांवर उभारण्यात अालेल्या सुलभ शाैचालयांची देखभाल दुरुस्ती करणे पालिकेला जड पडत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळेच सन २००९ पासून मक्तेदाराच्या भरवशावर सार्वजनिक शाैचालयांची जबाबदारी साेपवली अाहे. यात जनतेकडून शाैचालयासाठी दोनएेवजी रुपये तर अंघाेळीसाठी पाचएेवजी १० रुपये आकारले जात असल्याचे वृत्त यापूर्वी ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले हाेते. याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने अायुक्तांना निवेदन देऊन या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी केली अाहे.

अाॅडिट करण्याची मागणी : अातापर्यंत नागरिकांकडून लाखाे रुपयांची लूट केली असल्याने संंबंधित संस्थेचे अाॅडिट करून हा मक्ता रद्द करावा, तसेच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी केली अाहे.