आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटमधील शौचालयांबाबत 15 दिवसांत कारवाई : अपर आयुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत असलेल्या गाळ्यांची हस्तांतरण फी ठरवण्याच्या आपल्याच प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अधिकारी चांगलेच गोंधळले. पालिकेच्या हिताचा निर्णय घेताना कायद्यातील तरतुदींचा अभ्यास नसल्याने नगरसेवकांच्या प्रश्नांवर भंबेरी उडाली. एकाच वेळी दोन संदर्भ दिल्याने संभ्रम वाढल्याने हस्तांतरण फी चा विषय तहकूब ठेवण्याची वेळ आली. अभ्यास करून सुस्पष्ट प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेची महासभा गुरुवारी सकाळी ११ वाजता महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपलेली नाही अशा गाळ्यांचे हस्तांतरण फी बाबत नव्याने प्रस्ताव मार्केट वसुली विभागाकडून सभागृहात ठेवण्यात आला होता. यात पालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्यादृष्टीने कोल्हापूर महापालिकेने गाळ्यांच्या बाजारमूल्याच्या ३५ टक्के हस्तांतरण फी निश्चित केल्याने त्याच धर्तीवर जळगाव पालिकेने धोरणात्मक निर्णय घेण्यावर चर्चा झाली. यात खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी काेल्हापूर पालिकेने जाहिरातीत ३५ टक्के म्हटले असले तरी प्रत्यक्षात २५ टक्क्यांचा ठराव केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अशा पद्धतीने प्रशासन प्रस्ताव देत असेल तर भविष्यात शहरातील ४५०० गाळ्यांचे भवितव्य अंधारमय होईल. कारण ३५ टक्क्यांप्रमाणे हस्तांतरण फी ही लाखो रुपये होईल. हस्तांतरण हे महापालिका करीत नसल्याने त्यातून केवळ रॉयल्टी घ्यावी. प्रशासनाच्या भूिमकेमुळे भविष्यात कोणीही गाळे हस्तांतरण करणार नाही आपापसात व्यवहार केले जातील. यातून पालिकेचेही नुकसानच होणार असल्याचे लढ्ढा यांनी लक्षात आणून दिले.

विषयकेला तहकूब
गाळेहस्तांतरणाचा विषय चांगलाच लांबल्याने नगरसेवकांमध्येही संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले. अनेकांनी या विषयात बोलणेही टाळले. कायदेशीर अडचणींची भीती असल्याचे मत व्यक्त होऊ लागल्याने या विषयावर निर्णय घेता तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्याने प्रस्ताव मागवला
हस्तांतरणासंदर्भात कायद्यात काय तरतुदी आहेत. तसेच यासंदर्भात यापूर्वी केलेल्या करारनाम्यातील तरतुदींचाही अभ्यास करावा. महापालिकेला गाळे हस्तांतरणातून कशा पद्धतीने उत्पन्न मिळेल गाळे हस्तांतरणाचे व्यवहार कसे वाढतील याचा अभ्यास करून संभ्रम निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने सुस्पष्ट प्रस्ताव नव्याने महासभेत सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
समिती गठित होणार
पालिकामालकीच्या व्यापारी संकुलांपैकी गोलाणी मार्केटमधील बहुसंख्य गाळ्यांचा हस्तांतरणाचा विषय असल्याने कायदेशीर मार्ग काढून योग्य निर्णय घेतला जावा, असे मत नरेंद्र पाटील यांनी मांडला. यासाठी नगररचना सहायक संचालक, उपायुक्त यांचा सहभाग असलेली समिती गठित करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.

अधिका-यांमध्येच संभ्रम
गाळेहस्तांतरणाचा प्रस्ताव मार्केट वसुली विभागाने दिलेला होता. त्यावर नगररचना विभागाने कायदेशीर बाबी तपासल्या होत्या. मात्र, चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांकडेही अपूर्ण माहिती असल्याचे दिसून आले. नगरसेवकांच्या प्रश्नांवर समर्पक उत्तर मिळाल्याने आजच धोरणात्मक निर्णय घेणे टाळण्यात आले.

महासभेत नगरसेविका सीमा भाळे लता साेनवणे यांचा सत्कार करताना महापाैर राखी साेनवणे, उपमहापाैर सुनील महाजन, नितीन लढ्ढा, अाश्विन साेनवणे, ज्याेती चव्हाण.