आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Commissioner, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांचा ठिकाणा सापडेना; आयुक्त गेले कुणीकडे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-आर्थिक वर्ष सरत असल्याने विविध शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांकडून उद्दिष्टपूर्तीसाठी लगबग सुरू आहे. अशा महत्त्वाच्या कालावधीत जळगाव महापालिका आयुक्त मात्र कुठे गेले आहेत, याचा ठाव ठिकाणा अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनाही नाही. वरिष्ठ अधिकारीच नसल्याने पालिकेची प्रशासकीय यंत्रणादेखील सुस्तावल्याची स्थिती आहे.
पदाधिकारी आणि अधिकारी लोकशाहीची दोन चाके आहेत. दोघांमध्ये सकारात्मक आणि समन्वयाचे वातावरण असले तरच कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज सुरळीत चालू शकते. जळगाव पालिकेत मात्र याचा आभाव असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्त 10 मार्च रोजी औरंगाबाद येथे न्यायालयीन कामकाजासाठी गेले असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात त्या दिवशी पालिकेशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची सुनावणीची तारीख नव्हती. औरंगाबाद येथे पोहोचल्यावर काही वकिलांच्या भेटी घेऊन दुपारी 4 वाजता ते विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर पाच दिवसांपासून ते कुठे आहेत याची माहिती पालिकेतील अधिकारी किंवा पदाधिकार्‍यांनाही नाही. ऐन मार्च महिन्यातील आयुक्तांच्या दांडीने यंत्रणा सुस्तावली आहे.
काय म्हणतो कायदा
महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 38(1) अन्वये राज्य शासनास वेळोवेळी स्थायी समितीच्या अनुमतीने त्यास योग्य वाटेल अशा कालावधीसाठी आयुक्तांना अनुपस्थिती रजा देता येईल. 38 (2) अन्वये आयुक्तांच्या रजेच्या कालावधीत त्यांना द्यावयाचे भत्ते हे त्यांच्या वेतनाहून अधिक नसेल अशी रक्कम शासन निश्चित करेल त्या रकमेइतकी असेल.