आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Copt Corporater Selection Problem

मनपातील स्वीकृत सदस्यांचा तिढा सुटेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची नवीन कायद्यानुसार निवड करण्याचे प्रशासकीय पातळीवर प्रय} सुरू आहेत. खाविआ व मनसेकडून नोंदणीकृत संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या नावावर जोर दिला जात आहे. सोमवारी आयोजित तिसर्‍या बैठकीतही तोडगा निघाला नसल्याने आयुक्तांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक बोलावली आहे.

आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी स्वीकृत सदस्य निवडीसंदर्भात गटनेत्यांची बैठक झाली. यावेळी खाविआतर्फे सभागृह नेता नितीन लढ्ढा, गटनेता चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीतर्फे सुरेश सोनवणे, मनसेतर्फे ललित कोल्हे, जनक्रांतीचे सुनील पाटील, मविआचे नरेंद्र पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित होते. या बैठकीला येताना सर्वच गटनेत्यांनी तीन-तीन नावे आणणे अपेक्षित होते. मनसेतर्फे अनंत जोशी यांचा प्रस्ताव नगरसचिवांकडे सादर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक मनोज दयाराम चौधरी व लता मोरे यांच्या नावावर जोर देण्यात आला आहे. खान्देश विकास आघाडीतर्फे या बैठकीत कोणतेही नाव उघड करण्यात आलेले नाही. चर्चेत तोडगा न निघाल्याने सर्व पक्षांतर्फे प्रस्ताव सादर झाल्यावर कायदेशीर मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. उद्या अंतिम नावे सादर न झाल्यास शुक्रवारी होणार्‍या महासभेत हा विषय आणता येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

कायदेशीर बाबींची पडताळणी

समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचा पदाधिकारी देताना नेमक्या काय अटी आहेत, याची पुन्हा खोलवर चाचपणी करण्यात आली. संबंधित संस्थेचे तीन वर्षांचे ऑडिट असले पाहिजे, मनपाच्या हद्दीत संस्थेने आरोग्य, साफसफाई किंवा मनपाच्या कामाशी संबंधित प्रकल्प राबवलेले पाहिजे, असे निकष असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.