आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- गेल्या दीड वर्षापासून गाळेधारक व महापालिकेत सुरू असलेला संघर्ष मिटण्याची चिन्हे दिसायला सुरुवात झाली आहे. पालिकेने योग्य प्रीमियम व भाडे आकारणी करून 99 वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव ठेवत गाळेधारकांनी तडजोडीची तयारी दर्शवली आहे. सुरुवातीला संख्येने कमी दिसत असलेले गाळेधारकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेने शहरातील व्यापारी संकुलातील गाळेधारकांसोबत केलेल्या कराराची मुदत संपल्याने नव्याने केलेल्या करारावरून वाद उद्भवला आहे. पालिकेने केलेल्या ठरावात प्रीमियम व भाड्याची अवाजवी दर आकारणी केली होती. त्यामुळे गाळेधारकांनी एल्गार करत न्यायालयाचा रस्ता धरला होता. यात आता वर्षभराचा कालावधी उलटला आहे. गाळेधारक व पालिकेतील वाद अत्यंत विकोपाला गेला असून तोडगा काढल्याशिवाय वाद मिटणे अशक्य आहे. अशा परिस्थीतीत सेंट्रल फुले मार्केटमधील सुमारे 40 गाळेधारकांनी तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी नुकतीच स्थायी समिती सभापती रमेश जैन यांची भेट घेऊन 99 वर्षांचा करार करून योग्य प्रीमियम व भाड्याची आकारणी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात प्रकाश समदडीया यांनी तडजोडीशिवाय पर्याय नाही. नवीन करारात पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये तसेच गाळेधारकांचेही हित जोपासले जावे असा तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भांडणाचा काहीही उपयोग नसून दोघांचेही नुकसानच होणार असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.