आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Budget News In Marathi

फुगवट्यातून वास्तवतेकडे नेणारे बजेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अभिनव प्रकल्प राबवल्याने आशिया खंडात गौरव झालेल्या जळगाव पालिकेच्या अर्थसंकल्पाने आठ-दहा वर्षांतून हजारी अाेलांडली हाेती. कागदाेपत्री प्रचंड अर्थसंकल्प असल्याचे िदसत असले तरी नागरिकांना प्राथमिक सुविधाही िमळत नसल्याचा िवराेधाभास िदसून येताे. हा फुगवटा कमी करून वास्तवतेकडे नेणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे धाडस यंदाच्या अर्थसंकल्पात दिसून आले.
फुगवटा कमी केल्याने टीकेची झाेड उठवण्यापेक्षा याचा काय फायदा करून घेता येऊ शकतो याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे.
एका पाठाेपाठ एक नावीन्यपूर्ण मात्र धाडसी प्रकल्प हातात घेणाऱ्या जळगाव पालिकेने १०-१२ वर्षांपूर्वी शासनासह अाशिया खंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष वेधून घेतले हाेते. अर्थसंकल्प वजनदार असणाऱ्या (अार्थिक पत असलेल्या) पालिकांकडून एखाद्या याेजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर केला गेल्यास केंद्र अाणि राज्य शासनाकडून प्राधान्याने दखल घेतली जाते. हे तंत्र राजकारण्यांना चांगल्या पद्धतीने माहीत हाेते. २२०० काेटीचा शहर िवकास अाराखडा मंजुरीसाठी तेवढ्या सक्षम अर्थसंकल्पाची गरज भासली असावी. अापल्या भरभराटीच्या काळात सतरा मजली प्रशासकीय टाेलेजंग इमारत साकारणाऱ्या पालिकेची स्थिती ‘बडा घर, पाेकळ वासा’अशी झाली अाहे. मात्र, हे मान्य करण्याची सत्ताधाऱ्यांची मानसिकता नव्हती, त्यामुळे पत खालावलेली असली तरीही हजार, अकराशे काेटींच्या वर अर्थसंकल्प मंजूर केले जात हाेते. याचा फुगवटा कमी करून वास्तवाकडे लक्ष वेधण्याचे काम आयुक्त संजय कापडणीस यांनी दाेन वर्षांत केले अाहे.
फुगवटा कमी झाल्याने थेट जळगावकरांना फायदा हाेणार नसला तरी पालिकेवर असलेला कर्जाचा डाेंगर पाहता शासनाकडून मदत हाेण्याच्या दृष्टीने याचा सकारात्मक फायदा करवून घेता येणे शक्य अाहे. हुडकाेकडे असलेला कर्जाचा डाेंगर फेडताना वास्तव चित्र मांडले गेल्यास त्याचा याेग्य िवचार हाेऊ शकताे. कदाचित अार्थिक स्थितीची कल्पना येऊन उत्पन्न वाढीसाठी िनयाेजन करता येणार अाहे.
अर्थसंकल्पात जळगावकर केंद्रस्थानी
सामान्यजळगावकरांवर सरसकट करवाढ लादण्यापेक्षा कुत्रे अाणि पाळीव प्राणी पाळणाऱ्यांवर माफक कर अाकारणी, व्यावसायिक वापर करून रहिवास दर्शवणारे अशांकडे लक्ष केंद्रित केले अाहे. काॅलनीतील भूखंड िवकसित करणाऱ्या नागरिकांना कुंपण, वीज, पाणी यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवण्यासह भूखंड लाटणाऱ्यांना जरब बसवण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केले अाहे.