आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Building Fund Issue

दैनावस्था : भिंती सांगताहेत पालिकेची दशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीला 14 वर्षे झाली आहेत. मात्र, आर्थिक स्थितीमुळे इमारत खिळखिळी झालेली आहे. बाहेरून दिमाखदार असलेल्या प्रशासकीय इमारतीतील फर्निचर, दरवाजे तुटलेले, पीओपी कोसळलेले आहे, लिफ्ट बंद पडलेली आहे. पालिकेच्या मरगळलेल्या स्थितीबाबत भिंतीच बोलू लागल्या आहेत.

आशिया खंडातील एकमेव 17 मजली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गौरविल्या गेलेल्या जळगाव पालिकेला विदारक दिवस आले आहेत. पालिकेतील सर्व विभाग संगणकीकृत करण्यासाठी आवश्यक असलेले फर्निचर तयार करण्यासह संरचनात्मक बदल करण्याचा ठराव झाला होता. या दृष्टीने काम करण्यासाठी इंटेरियर डिझायनरकडून सर्व 17 मजल्यांच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र विविध देणी व कर्जामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पालिकेतील सत्ताधारी आणि अधिकार्‍यांनीही नूतनीकरणाची बाब गांभीर्याने घेतली नाही.

या बाबींचे सव्र्हेक्षण नाही

आयुक्त, उपायुक्तांच्या दालनांच्या छताचे पीओपी गळून पडले आहेत, हीच अवस्था इतर मजल्यावर आहे. मात्र किती ठिकाणच्या पीओपीची पडझड झाली याची नोंद नाही. दालनांचे फर्निचर खिळखिळे झाल्याने दालनांचे काचेचे दरवाजे तग धरीत नसल्याने ते काढून ठेवण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेले कुलर नादुरुस्त झाल्यावर भंगारात गेले आहेत. प्रत्येक मजल्यावर लिफ्ट बाहेरील भिंतींना लावलेल्या स्टाइलची पडझड झाल्याने भिंती उघड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी नवीन फरशी न बसवता सिमेंट लिंपले आहे.

गरज 1 कोटीची; तरतूद 70 लाखांची, खर्च 7 लाख
प्रशासनातर्फे 2012-13 साठी 611 कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. यात प्रशासकीय इमारत व प्रभाग 1 ते 4 मधील इमारत दुरुस्तीसाठी 70 लाखांची तरतूद केली होती. वर्षभरात देखभाल दुरुस्तीसाठी 7 लाखांचा खर्च झाला आहे.