आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या सतराव्‍या मजल्‍यावर जिल्हा बँकेचा पहिला हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- हुडकोच्या कर्जाचा हप्ता थकल्याने डीआरटी कोर्टाने महापालिकेची प्रशासकीय इमारत विक्री करण्यासंदर्भात महापालिकेला नोटीस दिली आहे; मात्र या इमारतीवर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचाही बोजा असल्याने बॅँकेने इमारतीवर पहिला अधिकार आमचा असल्याचे म्हणत डीआरटी कोर्टात जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

महापालिकेने हुडको आणि जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी या दोन्ही संस्थांना प्रशासकीय इमारत तारण करून दिली आहे. तथापि, हुडकोच्या कर्जाचा हप्ता थकल्याने डीआरटी कोर्टाने तारण ठेवलेली ही इमारत विक्री करून पैसे वसूल करण्याची नोटीस दिली आहे. या नोटिशीनुसार कारवाई झाल्यास जिल्हा बॅँकेच्या कर्जाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या मालमत्तेवर आपला बोजा पहिला असल्याचा दावा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने केला आहे.

जिल्हा बॅँकेच्या कर्जापोटी करण्यात आलेल्या ‘वन टाइम सेटलमेंट’ आणि ‘रिशेड्यूलिंग’नुसार सन 2019पर्यंत कर्ज फेडण्याची मुदत आहे. या कर्जापोटी बॅँकेने सरदार वल्लभभाई टॉवर आणि गोलाणी मार्केट तारण म्हणून घेतले आहे.

दोन्ही संस्थांकडून महापालिकेने सारख्याच कालावधीत कर्ज घेतले असले तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशाने सन 2005मध्ये जिल्हा बॅँकेचा बोजा चढवण्यात आला होता. त्यानंतर हुडकोचा बोजा चढवला गेला आहे.

मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 48नुसार ज्याच्याकडे मालमत्ता अगोदर तारण असेल, त्यावर त्याचा प्रथम हक्क असतो. ती मालमत्ता विक्री करून काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती दुसर्‍या दावेदारास मिळू शकते. अँड.प्रमोद एम.पाटील

काय सांगतात आकडे ?
प्रशासकीय इमारतीचे मूल्यांकन (गोलाणी मार्केटसह) 2013च्या दरानुसार 987 कोटी 69 लाख
हुडकोकडून घेतलेले कर्ज 141 कोटी 34 लाख
जिल्हा बॅँकेकडून घेतलेले कर्ज 59 कोटी 34 लाख