आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Can Save More Than 2000 Dollars

अशा प्रकारे महापालिका वाचवू शकते महिन्याला 2,234 डॉलर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आर्थिक अडचणीत सापडलेल्या जळगाव महापालिकेच्या प्रशासनाकडून शक्य त्या ठिकाणी काटकसर केली जात आहे. डिझेलच्या अनावश्यक वापरावर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलली जात असली तरी, डिझेल भरण्यासाठी प्राधिकृत केलेला पंप शहराच्या एका टोकाला असल्याने त्या ठिकाणी जाऊन इंधन भरून परत येण्यासाठी प्रत्येक वाहनाला 6 किलोमीटरचा फेरा पडतो. त्याऐवजी मध्यवर्ती भागातील पंपावरुन डिझेल भरले गेल्यास महिन्याकाठी पालिका 2 हजार 234 डॉलर्स वाचवू शकते.

पालिकेच्या ताफ्यात अधिकारी, पदाधिकारी आणि सार्वजनिक सुविधा पुरवणारी मिळूण 154 वाहने आहेत. या वाहनांमध्ये डिझेल भरण्यासाठी एमआयडीसीत पालिकेचा पंप आहे; मात्र ठोक खरेदीदारांसाठी असलेला जादा दर आकारला जात असल्याने पालिकेने खासगी पंपावरून डिझेल खरेदीचा निर्णय घेतला होता. सर्व वाहनांसाठी वर्षभरापूर्वी दरमहा 42 हजार लिटर डिझेल लागत होते. प्रशासनातर्फे त्यात काटकसर करत मार्च 2013पर्यंत डिझेलचा वापर 36 हजारांवर आणला गेला. त्यानंतर दर महिन्याला काटकसर सुरूच असून, ऑगस्ट महिन्यात पालिकेच्या वाहनांमध्ये 32 हजार 280 लिटर डिझेल भरले गेले. पालिकेतर्फे अशा प्रकारे काटकसर केली जात असली तरी, 68 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहरात सार्वजनिक सुविधा पुरवणार्‍या सर्व वाहनांना शहराच्या पूर्वेकडे जाऊन एकाच पंपावरून डिझेल भरावे लागते. डिझेल भरून पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रात येईपर्यंत प्रत्येक वाहनाला सरासरी 1 लिटर डिझेल लागते. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा सोयीच्या दोन ठिकाणी व्यवस्था केल्यास केवळ इंधन भरण्यासाठी वाया जाणारे 2 हजार 234 डॉलर्स (1 लाख 33 हजार 230 रुपये) प्रशासनास वाचवता येतील.

डिझेल बचतीसाठी केल्या जातात या उपाययोजना

पालिकेतर्फे डिझेलची बचत करण्यासाठी 8 पैकी 4 जुन्या रोडरोलरचा वापर बंद केला आहे. तसेच एकाच पंपावरून डिझेल भरणा करून दिला जाताना त्याची नोंद घेण्यासाठी पालिकेचा कर्मचारी हजर असतो