आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Commissioner Misuses Powers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महापालिका आयुक्तांकडून अधिकाराचा होतोय दुरुपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणूक काळात आयुक्तांकडून अधिकारांचा दुरुपयोग केला जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. नोटीस बजावणीचे गणित आणि वेळ सुद्धा चमत्कारिक असून याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाकडून काढलेल्या आदेशात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या 6 जुलै 2013च्या पत्राचा उल्लेख आहे. पत्रानंतर 8 जुलै रोजी नगरविकास विभागाने तातडीने पत्र पाठवले. राज्य शासनाकडूनही आचारसंहितेचा भंगच केला गेला. आयुक्तांनी 12 ऑगस्टला रात्री उशिरा नोटीस बजावल्या. न्यायालयात जाण्यास वेळ मिळू नये म्हणून ही प्रक्रिया उशिराने केली गेली. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे ते म्हणाले.