आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावध पवित्रा: इच्छुकांनी पर्याय ठेवल्याने राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेत उमेदवारीसाठी इच्छुकांनी पर्याय हाताशी ठेवल्याने राजकीय पक्षांनी धास्ती घेतली आहे. ऐनवेळी उमेदवार सोडून गेल्यास पंचाईत होऊ नये म्हणून शेवटच्या दिवशी अवघा तासभर आधी थेट निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडेच पक्षाचे पत्र आणि अधिकृत उमेदवारी अर्ज दिले जाणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरू केलेला मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवारी संपला. मात्र, अधिकृत उमेदवार लागलीच जाहीर करणार नसल्याचे दोन्ही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.राष्ट्रवादीने टाकली अपक्ष उमेदवार न भरण्याची अट
पक्षाने उमेदवारी न दिल्यास उमेदवार अपक्ष अर्ज भरण्याच्या मानसिकतेत आहेत. पक्षाने ए बी फॉर्म उपलब्ध न करून दिल्यास पर्याय म्हणून अपक्ष अर्ज द्यावा किंवा नाही हा सध्या राष्ट्रवादीमध्ये वादाचा मुद्दा ठरला आहे. पक्षाकडून मात्र अपक्ष अर्जाला विरोध करण्यात आला आहे. एकापेक्षा अधिक जण इच्छुक असलेल्या वॉर्डात पक्षाने एकाला उमेदवारी दिली, तर दुसर्‍या नाराज इच्छुक उमेदवाराकडून अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे. उमेदवारी अपक्ष अर्ज भरावा किंवा नाही यावरून काही पदाधिकार्‍यांमध्ये वाद आहेत.

बंडखोरीने त्रस्त झालेल्या राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि खान्देश विकास आघाडी या सर्व प्रमुख पक्ष, आघाड्यांतर्फे उमेदवारी जाहीर करण्यासाठी सावध पवित्रा घेतला जात आहे. शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. घोषणा नव्हे, तर थेट अधिकार्‍यांना अर्ज देण्यात येणार आहे.

काँग्रेसची भिस्त मुख्यमंत्र्यांवर
नगरविकास विभाग मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनीच महापालिकेच्या विकासासंदर्भात सहकार्य करणे अपेक्षित आहे. ते स्वत: जळगाव महापालिकेत लक्ष घालणार असल्याचे आमदार शरद रणपिसे यांनी सांगितले. काँग्रेसतर्फे उमेदवारी करू इच्छिणार्‍या 114 जणांनी मंगळवारी मुलाखती दिल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक पातळीवर सर्व समिती सदस्य उमेदवारी निश्चितीबाबत चर्चा करतील. निवडणूक येवू शकतील अशा उमेदवारांची नावे, शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे प्रदेशस्तरावर पाठविली जातील. प्रदेशवरून अंतिम उमेदवारी जाहीर होणार आहे.