आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव मनपा निवडणूक: वसुलीची नोटीस बजावलेल्या 13 जणांचे नातलग रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल व मोफत बससेवा प्रकरणात वसुलीची नोटीस बजावलेल्या 91 जणांपैकी 10 जण प्रत्यक्ष निवडणुकीत आहेत तर 13 जणांनी घरातील सदस्यांना आपल्या जागी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत 23 जणांसंदर्भात लागणारे निकाल लक्षवेधी राहतील.


नगरपालिकेच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या घरकुल योजना व मोफत बससेवा राबविण्यात आली होती. या योजनांसंदर्भात गुन्हे दाखल झाल्यानंतर विशेष लेखा परीक्षण करण्यात आले. त्यात योजनांशी संबंधित नगरसेवकांकडे रक्कम निघाली आहे. त्यामुळे या आजी-माजी नगरसेवकांना महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नुकतीच वसुलीची नोटीस बजावली आहे. या कारवाईला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली असली तरी 27 रोजी होणार्‍या सुनावणीवर या नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. नोटीस बजावलेल्या नगरसेवकांपैकी 10 जण थेट निवडणूक लढवत आहेत. त्यात चंद्रकांत सोनवणे, विजय वाणी, पुष्पा प्रकाश पाटील, सुभद्राबाई नाईक, दत्तू देवराम कोळी, सिंधू कोल्हे, रेखा चत्रभुज सोनवणे, विजय कोल्हे, सदाशिव ढेकळे, अजय जाधव यांचा समावेश आहे.


यांचे नातलग रिंगणात
13 जण स्वत: उमेदवारी करीत नसले तरी आपल्याच घरातील सदस्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात चंद्रकांत कापसे यांनी पत्नी प्रतिभा कापसे, डी.डी.वाणी यांनी सून तेजस्विनी वाणी, वासुदेव परशुराम सोनवणे यांनी पत्नी सुमित्रा सोनवणे, भगत बालाणी यांच्या वहिनी कंचन प्रकाश बालाणी, चत्रभुज सोनवणे यांनी पत्नी रेखा सोनवणे, कैलास सोनवणे यांनी पत्नी भारती सोनवणे, लीलाधर सरोदे यांनी पत्नी मीनाक्षी सरोदे, पांडुरंग काळे व सुधा काळे यांनी मुलगी डॉ. पूनम काळे, सून दीपमाला मनोज काळे यांना उभे केले आहे तर अलका नितीन लढ्ढा यांचे पती नितीन लढ्ढा स्वत: रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे मीना मंधान यांचे नातेवाईक अशोक मंधान, भागीरथी सोनवणे यांचा मुलगा गणेश सोनवणे व नातू रोहन गणेश सोनवणे उमेदवारी करीत आहेत.


मुलगा, मुलगी, नातू, पुतण्या व सूनेचा समावेश
नोटीस मिळालेल्या व वसुलीस पात्र नगरसेवक निवडून आले तरी अपात्र होतील असे वक्तव्य विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे या दहा नगरसेवकांकडे लक्ष लागून आहेच. विशेष म्हणजे अशा नोटीस दिलेल्या 13 जणांच्या परिवारातील सदस्य निवडणूक लढत असल्याने त्यांच्या प्रभागातील निकालाकडे लक्ष आहे.