आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election All Activites Run By 7 Shivajinagar

जळगाव महापालिकेच्‍या निवडणूकीचे सूत्र हलणार ‘7 शिवाजीनगर’ मधून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकासह विविध निवडणुकांची व्यूहरचना आखल्या गेलेल्या मात्र वर्षभरापासून नीरव शांतता असलेल्या ‘7 शिवाजीनगर’चा परिसर लवकरच पुन्हा गजबजणार आहे. पालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीची महत्त्वाची सूत्रे यापुढे याच ठिकाणाहून हलणार आहेत.

पालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. घरकुल प्रकरणामुळे आमदार सुरेश जैन यांच्या अडचणी वाढल्याने त्यांच्या नंतर निवडणुकीची सूत्रे सद्या त्यांचे लहान बंधू रमेश जैन यांच्याकडे आहेत. सत्ताधारी गटातर्फे पालिका निवडणुकीच्या हालचाली पहिल्यांदाच शिवाजीनगरातील बालेकिल्ल्यात न होता खान्देश कॉम्प्लेक्समधून सुरू होत्या. याच कार्यालयातूनच उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकारणे, भेटीगाठी असे कार्यक्रम सुरू आहेत. निवडणूक जवळ येत असताना मोठी वर्दळ वाढली आहे. राजकीय सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘7 शिवाजीनगर’ची जागा अधिक सोयीची असल्याने उमेदवार मुलाखती व रणनीती तेथूनच आखली जाण्याची तयारी आहे.

मध्यवर्ती ठिकाण ठरत होते अडचणीचे
खान्देश कॉम्प्लेक्समधील रमेश जैन यांचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी आहे. निवडणुकीच्या दृष्टीने भेटीसाठी त्यांच्याकडे कोण येतो, कोण जातो यावर सहज लक्ष ठेवणे बाहेरच्या मंडळींना शक्य होते. खान्देश विकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याची इच्छा असलेले अन्य पक्षाच्या नगरसेवकांना मध्यवर्ती ठिकाण अडचणीचे ठरत होते. आमदार सुरेश जैन यांना मानणारी शहरातील नामांकित व काही नेते मंडळी ‘7 शिवाजी नगर’ या ठिकाणीच येणे पसंत करतात. या ठिकाणी भेटीगाठी घेणे काहींना अधिक सुरक्षित वाटत असल्याचे सर्व बाबींचा विचार करून ठिकाण बदलवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.


कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असल्याने खान्देश कॉम्प्लेक्समधील सद्याच्या कार्यालयाची जागा कमी पडते आहे. पार्किंगसाठीही जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. व्यावसायिकांना त्रास नको म्हणून निवडणुकीच्या हालचाली ‘7 शिवाजीनगर’ येथून करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. नितीन लढ्ढा, गटनेता खान्देश विकास आघाडी