आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महानगरपालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. त्यामुळे मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून, 1 सप्टेंबर रोजी मतदान होऊन 2 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल. त्यादृष्टीने प्रशासनाने 22 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीही जाहीर केली आहे.

पालिका निवडणुकीसाठी 1 जुलै रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, सोमवारी प्रशासनाने नागरिकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या निवडणुकीत 3 लाख 57 हजार 336 मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. त्यात 2 लाख 1 हजार 113 पुरुष, तर 1 लाख 74 हजार 272 महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे, एकूण 3 लाख 75 हजार 385पैकी 18 हजार 49 मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. दोन सप्टेंबरला मजमोजणी संपल्यानंतर आजपासून सुरू झालेली आचारसंहिताही संपूष्टात येणार आहे.

राजकीय घडामोडींना येणार वेग
निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष व आघाड्यांनी इच्छुकांकडून अर्ज भरून मागवले आहेत; परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने प्रभागांतील उमेदवारांची निवड केलेली नाही. त्यामुळे कोअर कमिट्या तयार होऊन निवडणुकीच्या हालचालींना गती येणार आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचे कळताच राजकीय पक्षांची कार्यालयेदेखील गजबजल्याचे चित्र सायंकाळी दिसले.