आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election EVM Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एन्टर’ बटण करणार मतदारांचा संभ्रम दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीसाठी प्रभागातील उमेदवारांच्या संख्येनुसार बॅलेट मशीन लावण्यात येणार आहे. त्यानुसार ‘अ’ आणि ‘ब’ गटातील उमेदवारांची नावे एकाच बॅलेट मशीनवर राहणार आहेत. मतदारांना एकावेळी दोन जणांना मतदान करावे लागणार आहे. एका उमेदवाराला अथवा कुणालाही मतदान करायचे नसेल तर तशी सोयही ‘एन्टर बटण’द्वारे करून दिली आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड पद्धत असल्याने एका वॉर्डात एक उमेदवार होता. त्यामुळे एकालाच मतदान करण्याचा अधिकार होता. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग झाल्याने दोन उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. 34 क्रमांकाच्या प्रभागात तीन उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. याबाबत मतदारांमध्ये संभ्रमावस्था दिसूून येत आहे. एका गटातील दोघांना मते देता येतील का? एका गटात एकाच उमेदवाराला मतदान करायचे असेल तर? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांचे निराकरण ‘एन्टर’ हे बटण करणार आहे. बॅलेट मशीनवर उमेदवारांची नावे पाहिल्यानंतर मतदान करायचे नसेल तर थेट खाली असलेले लाल रंगाचे एन्टर बटण दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

एकालाही करता येईल मतदान
‘अ’ किंवा ‘ब’ गटात कोणत्याही एकाच उमेदवाराला मतदान करता येणार आहे. एकदा बटण दाबल्यानंतर बीफ वाजल्यानंतर पुन्हा त्या गटातील कोणतेही बटन दाबले तरी मतदान होणार नाही. एका उमेदवाराला मतदान करता येणार आहे. ज्या गटातील उमेदवाराला मतदान करायचे त्या उमेदवाराच्या नावापुढील बटण दाबून मतदाराला मतदान करता येईल. कुणालाच मतदान करायचे नसेल तर तशीही व्यवस्था यंत्रात केली आहे. यामुळे मतदारांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.

आजपासून जुना डाटा उडवणार
मतदानासाठी शहरात 440 मतदान केंद्र राहणार आहेत. त्यानुसार 10 टक्के जादा मतदान यंत्रांची व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे. सोमवारपासून मतदान यंत्रातील डाटा उडवण्याचे क ाम केले जाणार आहे. मतदान यंत्राच्या देखभालीसाठी हैद्राबाद येथून दोघे कर्मचारी शहरात आलेले आहेत. मतमोजणी होईपर्यंत ते येथेच थांबणार आहेत.

एका बॅलेटवर 15 नावे
एका बॅलेट मशीनमध्ये उमेदवारांची 15 नावे बसतात. त्यापैकी अ आणि ब गट हे नाव टाकल्यानंतर 13 उमेदवारांची नावे एका बॅलेट मशीनवर बसतील. त्यापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या प्रभागात दोन बॅलेट मशीन ठेवले जातील. एका प्रभागात कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त 18 उमेदवार रिंगणात आहेत. सरासरी बहुतेक वॉर्डात दहाच्यावर उमेदवार आहेत.

16 प्रभागांमध्ये प्रशासन बिनधास्त
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन अंतिम लढाईसाठी तयारीला लागले आहे. मतदानासाठी निर्माण केलेल्या 433 मतदान केंद्रांपैकी 21 प्रभागातील 41 केंद्र संवेदनशील व उपद्रवी आहेत. त्यात 2008 च्या निवडणुकीत गुन्हे दाखल असलेले आठ केंद्रही डोकेदुखी ठरणारे असल्याने त्यावर कॅमेर्‍याच्या माध्यमातून नजर राहणार आहे. विशेष म्हणजे 16 प्रभागांमध्ये प्रशासन बिनधास्त राहणार आहे.

महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 406 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या पंचवार्षिकमध्ये उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. 433 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून त्यात मतदारांच्या सोयीसाठी खासगी व शासकीय इमारतींचा वापर करण्यात येणार आहे. उमेदवारांकडूनही नवीन मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे.

41 उपद्रवी केंद्र अशी
खुबचंद सागरमल विद्यालय शिवाजीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह इंद्रप्रस्थनगर, नाभिक समाजमंदिर इंद्रप्रस्थनगर, अलफैज माध्यमिक विद्यालय, मनपा प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक 15 शिवाजीनगर, मनपा क्रमांक 1 शिवाजीनगर, इंदुबाई पाटणकर मराठी शाळा, कुंभारवाडा समाजमंदिर प्रजापतनगर, बिंदाबाई सोनवणे समाजमंदिर वाल्मीकनगर बगिचा, बुधो मोतिराम सोनवणे समाज मंदिर वाल्मीकनगर, नवीन बालविकास विद्यालय मनपा शाळा क्रमांक 21, मनपा शाळा क्रमांक 3 लिधूरवाडा, गंगुबाई यादव मनपा मुलींची शाळा क्रमांक 17, मनपा फातेमाबी उर्दू शाळा क्रमांक 18, शाहुनगर मनपा शाळा क्रमांक 12 (पडकी शाळा), एसएमआयटी जळगाव, संत मुक्ताई प्राथमिक विद्यामंदिर, र्शीरामनगर समाज मंदिर, सरस्वती विद्याप्रसारक मंडळ, आयडीयल इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्राळा हुडको, जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर हरिविठ्ठलनगर, मनपा शाळा क्रमांक 23 व 42 हरिविठ्ठलनगर, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, रामलालजी चौबे मनपा शाळा क्रमांक 2, मनपा शाळा क्रमांक 22 रामपेठ, मनपा सेंट्रल शाळा क्रमांक 3 पांजरपोळ पाण्याच्या टाकीजवळ, काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय, र्शमसाधना ट्रस्ट प्रतिभा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अंधशाळा नाथवाडा, मनपा शाळा क्रमांक 45 विवेकानंदनगर, मनपा शाळा क्रमांक 8 व 16 तसेच 41, संत कंवरराम हिंदी पाठशाळा, तडवी समाजमंदिर जुना शिरसोली नाक्याजवळ, मेहरूण के.जी.मणियार प्राथमिक विद्यालय, मेहरूण यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय, मेहरूण मिल्लत प्राथमिक शाळा अक्सानगर, मेहरूण मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 36 व 56 अक्सानगर, मेहरूण माता रमाबाई आंबेडकर शिक्षण व स्मारक समिती विद्यालय अक्सानगर, मेहरूण संत ज्ञानेश्वर महराज प्राथमिक विद्यालय सप्तर्शृंगी कॉलनी, मेहरूण र्शीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सुप्रीम कॉलनी मनपा शाळा क्रमांक 32( मराठी शाळा), सुप्रीम कॉलनी मनपा शाळा क्रमांक 11 (उर्दू शाळा), अयोध्यानगर सिद्धिविनायक विद्यालय व ज्युनियर कॉलेज र्शीनगर कॉलनी या मतदान केंद्रांचा समावेश आहे.

राजकीय पक्षांच्या 20 प्रचार सभांना परवानगी
महापालिका निवडणुकीसाठी 25 ऑगस्टपर्यंत 20 प्रचार सभांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 20 प्रचार वाहनांना तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी 81 ऑटो रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. रविवारी आचारसंहितेबाबत एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. महानगरपालिकेने आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी सात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे प्रत्येकी 4 प्रमाणे एकूण 28 व्हिडिओ फोटोग्राफर, पोलिस यंत्रणेकडे 2 व्हिडिओग्राफर, आचारसंहिता कक्षाकडे 2 व्हिडिओग्राफर नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हा दाखल होणार आहे.