आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी मिळाल्यास घर विकण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या दृष्टीने अनेक किस्से पुढे येऊ लागले असून उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीतील खर्चासाठी राहते घर तसेच प्लॉटदेखील विक्री करण्याची तयारी इच्छुक दाखवू लागले आहेत. परंतु त्यानंतर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नसल्याने अशा कार्यकर्त्यांमुळे मुलाखती घेणार्‍या कोअर कमिटीच्या सदस्यांच्याही भुवया उंचावत आहेत. यासारखे अनेक अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याने पदाधिकार्‍यांसमोर प्रश्न उपस्थित होत आहेत.

महापालिकेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आठवड्याचा कालावधी शिल्लक असून राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीतर्फे 29 जुलैपासून मुलाखतींचा कार्यक्रम राबवला जात आहे.

यादरम्यान येणार्‍या इच्छुकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांच्या मानसिकतेचा वेध घेतला जात आहे. खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन, महापौर किशोर पाटील, गटनेते नितीन लढ्ढा, प्रा.चंद्रकांत सोनवणे, पुष्पा पाटील, करीम सालार, विष्णू भंगाळे, कैलास सोनवणे, राजकुमार अडवाणी या कोअर कमिटीकडून इच्छुकांशी चर्चा केली जात आहे.

पहिलाच दिवस 1 ते 16 प्रभागांतर्गत येणार्‍या शिवाजीनगर परिसरासह काही भागातील इच्छुकांनी गर्दी केली होती. राजकीय अनुभव नसतानाही कामे करण्याची तयारी दाखवणारे अनेक जण आग्रह धरत आहेत.