आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावातील निलंबित कर्मचार्‍यांना निवडणुकीचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिका निवडणुकीमुळे काही कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढली असली तरी काही जणांच्या दृष्टीने मात्र ही सुवर्ण संधी चालून आली आहे. विविध कारणांमुळे निलंबित असलेल्यांना प्रशासनाकडून निवडणूक कामी यंत्रणा आवश्यक असल्याचे कारण पुढे करीत कामावर सामावून घेतले आहे.

एमआयडीसीतील भारत गॅसला 126 वृक्षतोडीची परवानगी दिल्याप्रकरणी तत्कालीन पर्यावरण अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी संबंधितांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. त्यांच्या चौकशीला अद्याप सुरुवात झालेली नाही. संबंधित कर्मचार्‍यास चौकशीस अधीन राहून कामावर सामावून घेण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. या प्रकरणी चौकशी होण्यापूर्वीच दिलीप सूर्यवंशी यांच्याकडून चूक कबूल असल्याचे पत्र घेऊन प्रशासनातर्फे त्यांना कामावर सामावून घेतले आहे. दुसर्‍या एका प्रकरणात शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मद्य प्राशन करताना आढळून आल्याने राजू सपकाळे तसेच संतोष पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. या कारवाईनंतर घरी बसलेल्या कर्मचार्‍यांना गेल्या आठवड्यात पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. निलंबनाचा सपाटा लावून शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणार्‍या आयुक्तांकडून निलंबितांना कामावर घेताना ही बाब कुठेही उघड होणार नाही याची काळजी घेत गोपनीय राखण्याचे बजावले असावे. निवडणूक काळात मनुष्यबळाचे कारण पुढे करीत अजून काही निलंबितांना कामावर सामावून घेण्याच्या हालचाली सुरूआहेत.