आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष काळजी: जळगावातील सभांमुळे पोलिसांना फुटला घाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ बुधवारी गृहहमंत्री आर.आर.पाटील, भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे आणि समाजवादी पक्षाचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी बुधवारी शहरात दाखल झाले होते. सर्वांच्या सभांना बंदोबस्त पुरवण्यासाठी पोलिस प्रशासनाला चांगलाच घाम फुटला.

पाटील, मुंडे आणि आझमी या तिघांनी प्रत्येकी दोन सभा घेण्याचे नियोजन प्रशासनाला दिले होते. त्यामुळे इतर कामकाजासह अतिरिक्त बंदोबस्तासाठी पोलिसांची ससेहोलपट झाली. आझमी यांनी गेल्या आठवड्यात आपल्या भाषणादरम्यान राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर दुसºयाच दिवशी दोघेही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पाटील आणि आझमी हे दोघे शहरात असल्यामुळे शांतता राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी
स्टार प्रचारकांच्या शहरातील मुक्कामांच्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस, सिल्व्हर पॅलेस, सभांची सर्व ठिकाणे तपासण्यात आले

आबांसाठी पोलिस कर्मचा-यांना विशेष सूचना
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या सभांसाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. दुपारी 11 वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचा-यांना विशेष सूचना दिल्या गेल्या. बंदोबस्त तपासण्यासाठी चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन मोहाडीकर स्वत: शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. तर वाहतूक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांनीही वाहतुकीसंदर्भात विशेष काळजी घेतली होती.