आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - राजकारणाचेकेंद्रबिंदू असलेल्या जळगाव महापािलकेत राजकीय बदलाचे वारे सुरू अाहेत. एकेकाळी सभागृहात विराेधात उभे राहणारे एकत्र अाले असून
राजकीय वातावरण बदलले अाहे. खाविअाचे नगरसेवक कैलास साेनवणे यांच्या घरी गुरुवारी मनसे नेते ललित काेल्हे यांनी भेट घेत बराचवेळ गप्पा मारल्या. राजकारणात
काेणी काेणाचा शत्रू किंवा मित्र नसताे, याची प्रचिती येत अाहे.
पालिकेच्या महासभेत मनसे नगरसेवक अनंत जाेशी यांना इतरांना समजेल अशा पद्धतीने बाेलण्याचा सल्ला कैलास साेनवणे यांनी दिला हाेता. या कारणावरून कैलास सोनवणे अाणि मनसे गटनेते ललित काेल्हे यांच्यात जाेरदार शाब्दिक चकमक झाली हाेती. या घटनेनंतर दाेघांच्या कार्यकर्त्यांच्या डाेक्यात नेत्यांच्या भांडणाची गाेष्ट सेट झालेली हाेती.विधान परिषद,विधानसभानिवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती अाणि समीकरणे माेठ्या प्रमाणात बदलली अाहेत. पािलकेत एकमेकांच्या विराेधात भांडणारे यापुढे मांडीला मांडी लावून निणय घेणार अाहेत. त्यामुळे तात्विक मतभेद अाणि वाद बाजूला सारून तूर्त तरी सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण हाेत असल्याची स्थिती अाहे.काेल्हे गुरुवारी जुने जळगावात जात असताना साेनवणे घराबाहेर खुर्ची टाकून बसलेले दिसल्याने काही वेळ दाेघांनीही कार्यकर्त्यांसमक्ष गप्पा मारल्या. दाेघांनाही एकत्र पाहून जा-ये करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.