आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election: Opposition Rise Many Objectionable Issues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महानग‍रपालिका निवडणूक: विरोधकांनी काढले हरकतींचे अनेक अस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीसाठी स्पर्धकांनी अर्ज दाखल केल्यावर त्यांना रोखण्यासाठी विरोधकांकडून हरकतींचे अस्त्र वापरण्यात आले. पालिकेतील सत्ताधारी तसेच इतर पक्षातील दिग्गज उमेदवारांना हरकतींच्या मुद्याला सामोरे जावे लागले. हरकती घेणा-यांना योग्य पुरावे सादर न करता आल्याने अनेकांचे हे अस्त्र फुसके ठरले. काही हरकतींवर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.


पालकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेतील अर्ज छाननीचा टप्पा बुधवारी झाला. अर्ज दाखल केलेल्यांविरुद्ध दाखल असलेल्या हरकतींवर छाननीदरम्यान तपासणी करण्यात आली. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अडचणी वाढविण्यासाठी हरकती दाखल करण्यात आल्या. मात्र, सबळ पुरावे सादर करता न आल्याने निकाली काढण्यात आल्या. महापौर किशोर पाटील, स्थायी समिती सभापती रमेश जैन यांच्या अर्जावरही हरकती घेण्यात आल्या होत्या. मात्र सबळ पुरावे सादर करण्यात हरकतदार अपयशी ठरले. गणेश कॉलनीतील विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या स्पर्धकांवर हरकती घेतल्याने त्यावर तत्काळ निकाल न देता शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.


‘खाविआ’-राष्‍ट्रवादी उमेदवारांमध्ये वाद
अर्जांची छाननी प्रक्रिया सुरूअसताना पालिकेच्या दुस-या मजल्यावर प्रभाग क्रमांक 32 ‘ब’ मधून निवडणूक रिंगणात उतरलेले प्रतिस्पर्धी उमेदवार हजर होते. राष्‍ट्रवादीचे उमेदवार इब्राहीम पटेल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार इकबालउद्दीन पिरजादे यांना तीन अपत्य असल्याची मला माहिती आहे, मात्र पुरावा नाही. विनापुरावा हरकत घेतली जाईल काय, अशी विचारणा केली. यामुळे संतप्त झालेल्या इकबालउद्दीन पिरजादे व इब्राहीम पटेल यांच्यात जोरदार वाद झाला. नेत्यांचा वाद होत असल्याने दोन्हींचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहून अधिकारी तसेच पोलिसांनी दोन्ही गटांना आवरून रवाना केले.


हरकती घेतलेले उमेदवार
उमेदवार : रमेश जैन (21 ‘ब’)
हरकत घेणार : श्रीकांत खटोड
हरकत : घरकुलात भागीदार असल्याची हरकत.
निर्णय : सिद्ध न झाल्याने हरकत फेटाळली
उमेदवार : किशोर पाटील (36 ‘अ’)
हरकत घेणार : नितीन सपके
कारण : कराटे संस्थेच्या खर्चाचा हिशेब सादर न करणे, थकबाकी न भरणे.
निर्णय : पैसे भरल्याचा पुरावा सादर केल्याने हरकत निकाली.
उमेदवार : जयश्री सुनील महाजन (31 ‘ब’)
हरकत घेणार : संजय ढेकळे
कारण : पालिकेचे ठेकेदार आहेत.
निर्णय : पुराव्यांअभावी हरकत फेटाळली.
उमेदवार : जयश्री नितीन पाटील (10 ‘ब’)
हरकत घेणार : डिगंबर दौलत वाणी
कारण : घराचे अनधिकृत बांधकाम.
निर्णय : दाखल हरकतीवर शुक्रवारी सुनावणी
उमेदवार : तेजस्विनी सचिन वाणी (10 ‘ब’)
हरकत घेणार : नितीन पाटील
कारण : घरभाड्याची रक्कम कमी दाखवून पालिकेची फसवणूक.
निर्णय : दाखल हरकतीवर शुक्रवारी सुनावणी.
उमेदवार : चंद्रशेखर अत्तरदे (10 ‘अ’)
हरकत घेणार : अश्विन सोनवणे
कारण : अनधिकृत बांधकाम.
निर्णय : दाखल हरकतीवर शुक्रवारी सुनावणी


बाद उमेदवार
बुधवारी छाननी झाली. वैधता प्रमाणपत्र, सूचक-अनुमोदक नसणे, अर्जातील खाडाखोड अशा कारणांमुळे 50 अर्ज अवैध ठरले तर 832 अर्ज वैध ठरले. तसेच माधुरी चंद्रशेखर अत्तरदे (10अ), चंद्रशेखर अत्तरदे (10अ), तेजस्वीनी वाणी (10ब) यांच्या अर्जांवर 16ला निर्णय होईल.
खान्देश विकास आघाडी
० प्रतिभा गजानन देशमुख (11अ)
० ललिता अनिल सुरळकर (12 ब)
० नसीब पिरजादे (32 ब)
० संगीता मोहनदास राणे (24 अ)
काँग्रेस
० रुपाली सागर सपके (4 ब)
० जिजाबाई उमाकांत चौधरी (11 अ)
० श्यामकांत दगडू तायडे (14 अ)
० अमीना मुशीर तडवी (16 अ)
० सुनील पद्माकर बढे (18 अ)
० राजेंद्र धनाजी वराडे (27 ब)
० विनोद भरतसिंग शिंदे (33 अ)
० मुन्नाखान जमीलखान (32 ब)
०सुरेश बाबुराव तितरे (34 क)
राष्‍ट्रवादी काँग्रेस
० माया शशिकांत जडे (17 अ)
० उदय दिगंबर खांदे (29अ)
० अर्चना वसंत कदम (29 ब)
० प्रदीप अशोक पाटील (33 अ)
० संगीता अनिल सोनवणे (35 अ)
भारतीय जनता पक्ष
० नितीन गणसिंग पाटील (15 अ)
० विद्या नितीन गायकवाड (34 अ)