आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election Publicity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विष्णू भंगाळेसाठी काका धावले; भागवत भंगाळे प्रचारासाठी मैदानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेले हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारासाठी मैदानात उतरले खरे परंतु राष्ट्रवादीच्या नव्हे तर चक्क खान्देश विकास आघाडीच्या उमेदवारासाठी. खाविआचे उमेदवार व भागवत भंगाळे यांचे पुतणे प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी करीत आहेत. त्यांचा प्रचारसभेत ते सहभागी झाले.

खान्देश विकास आघाडीचे उमेदवार विष्णु भंगाळे यांचे काका भागवत भंगाळे सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा त्यांनी प्रचार केला तर विष्णू भंगाळे यांचे दुसरे काका डॉ.अर्जुन भंगाळे हे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत. भागवत भंगाळे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुतण्यासाठी वेळ काढला. त्यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये जाऊन विष्णू भंगाळेच्या प्रचार रॅलीत हजेरी लावली.

कुणी बघत तर नाही ना याकडे नजर ठेवत त्यांनी काही अंतर ठेवून ओळखीच्या मतदारांच्या भेटी घेतल्या. मध्यवस्तीतून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी प्राचर रॅलीतून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे खान्देश विकास आघाडीचे विष्णू भंगाळे तसेच भाजपचे उमेदवार सुरेश भोळे या दोघांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही.