आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Election Ramesh Jain Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमेश जैन यांना निवडणूक रिगणात उतरविण्याच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलत असून त्या दृष्टीने लढतींचे चित्रही बदलताना दिसत आहे. खान्देश विकास आघाडीच्या निवडणुकीची धुरा सांभाळत असलेले रमेश जैन यांनी यावेळी निवडणूक न लढण्याचे ठरवले होते. मात्र, सभागृहात विरोधकांवर अंकुश राहण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवावी, यासाठी जवळच्या पदाधिकार्‍यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

पालिकेतील सात-आठ वर्षांच्या राजकीय कार्यकाळात विविध पदांचा अनुभव असलेले रमेश जैन यांच्याकडे तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे. खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांना निवडून आणत सत्तेत राहण्यासाठी रमेश जैन यांना पूर्णवेळ इतरांसाठी द्यावा लागणार आहे. या सर्व गडबडीत स्वत:च्या प्रचाराकडे लक्ष राहणार नसल्याची जाणीव असल्याने यावेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे ते निवडून आलेल्या सद्याच्या परिसरातूनही इतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पालिका निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे काय असतील याबाबत आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळे रमेश जैन यांनी सभागृहात राहणे आवश्यक आहे, विरोधक तसेच सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने ही बाब आवश्यक वाटत असल्याने त्यांच्या जवळच्या पदाधिकार्‍यांकडून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला जात आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलवितात किंवा नाही, याचे चित्र योग्यवेळी स्पष्ट होणार आहे. मात्र यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव त्यांच्याकडून केली जात आहे. पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीचा दाखला, पालिकेतून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र यासह इतर बाबींची जुळवाजुळव त्यांच्यासाठी सुरू आहे.

पदाधिकार्‍यांचा आग्रह
खान्देश विकास आघाडीच्या निवडणुकीची धुरा सांभाळत असलेले रमेश जैन यांनी यावेळी निवडणूक न लढण्याचे ठरवले होते. मात्र, सभागृहात विरोधकांवर अंकुश राहण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवावी, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.