आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुकरण: महापालिकेची वर्षाकाठी 40 लाख रुपयांची होणार इंधन खर्चाची बचत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- डिझेलच्या घाऊक ग्राहकांसाठी केंद्राने वेगळे दर आकारल्यामुळे जळगाव महानगरपालिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या चाकावर चाक आणत खासगी डिझेल पंपांचा रस्ता धरला आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे पालिकेचे वर्षाकाठी 40 लाख रुपये वाचणार आहेत.

औरंगाबादरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सर्वोदय सर्व्हिसेस सेंटरच्या पंपावरून डिझेल भरण्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच विस्कळीत वाहतुकीमुळे गाजणार्‍या अजिंठा चौफुलीवरील वाहतुकीत भर पडणार आहे.

महिन्याला 32 ते 35 हजार लिटर डिझेल खरेदी करणार्‍या जळगाव महापालिकेला घाऊक ग्राहक म्हणून जादा दर मोजावे लागणार होते. पालिकेच्या ताफ्यात एकूण 154 वाहने असून यातील 70 वाहने आरोग्य विभागातील आहेत. डिझेल संदर्भातील नवीन धोरणामुळे आहे त्याच प्रमाणे स्वत:च्या पंपावरून डिझेल खरेदी सुरू ठेवल्यास दर महिन्याला 3 लाख 35 हजार 425 रुपये तोटा होणार होता. तोटा वाचविण्यासाठी पालिकेच्या मालकीच्या एमआयडीसीतील पंपावरुन डिझेल भरणे बंद केले आहे.

वर्षाकाठी 40 लाखांची बचत
दर महिन्याला पालिकेला 32 हजार 500 लिटर डिझेल लागते, याची किंमत 17 लाख 70 हजार 250 होते. थेट डिझेल मागवल्यास यासाठी नवीन धोरणानुसार महिन्याला 21 लाख 5 हजार 675 रुपये मोजावे लागणार होते. वर्षाला याचा खर्च 2 कोटी 5 लाख 88 हजारापर्यंत जाणार होता. खासगी पंपावरून डिझेल भरण्यास सुरुवात केल्याने पालिकेची वर्षाकाठी 40 लाख 25 हजार रुपये बचत होणार आहे.

पालिकेला लागते रोज 1125 लिटर डिझेल
पालिकेच्या मालकीचे 154 वाहने आहेत. सर्व वाहनांना एका दिवसाला 1 हजार 125 लिटर डिझेल लागते. पालिकेच्या एमआयडीसीमधील पंपावरून आतापर्यंत ही वाहने डिझेल भरत आहेत. याठिकाणचा साठा संपल्यावर शहरातील मध्यवर्ती भागातील पंपांवरून पालिकेची सर्व वाहने डिझेल भरणार आहे.

टॅँकरमागे 1 लाख 23 हजार वाढले
पालिका मागवत असलेल्या एका 12 हजार लिटरच्या टँकरसाठी जानेवारी अखेरपर्यंत 6 लाख 54 हजार रुपये लागत होते. शासनाच्या नवीन धोरणानुसार याच टॅँकरसाठी आता 7 लाख 77 हजार 523 रुपये मोजावे लागणार आहे. यात पालिकेला 1 लाख 23 हजार 523 रुपये प्रति टँकर नुकसान होणार आहे.