आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Get 124 Crores Under Amrut Scheme

अमृत याेजनेंतर्गत १२४ काेटी रुपये मंजूर, ४६६ किमी गटारी जलवाहिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्र शासनाच्या अमृत याेजनेंतर्गत जळगाव महापालिकेला पहिल्या टप्प्यात १२४ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे. यात मलनिस्सारण पाणीपुरवठा याेजनेवर खर्च केेले जाणार अाहेत. विशेष म्हणजे या याेजनेसाठी निवड झालेल्या तीन पालिकांमध्ये जळगावचा समावेश करण्यात अाला अाहे.

जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामे ठप्प अाहेत. काेणतेही विकासाचे काम करायचे म्हटले, म्हणजे माेठ्या प्रमाणात निधीची गरज असते. कर्जबाजारी महापालिकेच्या माध्यमातून किरकाेळ कामेही केली जात नाहीत. त्यामुळे अमृत याेजनेत जळगावचा समावेश झाल्याने कामांना सुरुवात हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. त्यातच नुकतीच नाशिक येथे झालेल्या बैठकीतही डिटेल्स प्राेजेक्ट रिपाेर्ट तयार करून कालबद्ध नियाेजन सादर करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

विशेष म्हणजे पालिकेला या याेजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १२४ काेटींचा निधीही मिळणार अाहे. सुमारे ४०० काेटी रुपयांच्या अाराखड्यात अाता पहिल्या टप्प्यात लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार अाहे.

संपूर्ण शहरात जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे ३५० काेटी रुपये खर्च लागणार अाहे. अमृत याेजनेत पहिल्या टप्प्यात १२४ काेटी मंजूर झाले अाहेत. यातून ही कामे करताना अाधी शहराचे झाेन तयार करण्यात येणार अाहेत.

झाेननिहाय हाेणार कामे
महापालिका क्षेत्रात ४६६ किलाेमीटर अंतराचे रस्ते अाहेत. या रस्त्याला लागून दाेन्ही बाजूने गटारी बांधण्यात येणार अाहेत. त्या संपूर्ण बंदिस्त भुयारी स्वरूपाच्या असतील. तसेच शहरात सतत गळतीचे प्रकार हाेत असल्याने जुनी जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यात येणार अाहे. विशेष म्हणजे शहराचा विस्तार माेठ्या प्रमाणात झाला असून नवीन भागात अजूनही रस्ते गटारी नाहीत. त्यामुळे शहरातील उताराचा अभ्यास करून नवीन भागाकडून जुन्या भागाकडे कामे करण्याचा प्रयत्न राहणार अाहे. यासंदर्भात अभियंत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शहर अभियंता दिलीप थाेरात यांनी सांगितले.