आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Gharkul Scam Issue

माजी महापौरांचा अडचणी वाढल्या; याचिका दाखल करण्यास शासनाची परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी माजी महापौर सदाशिव ढेकळे व अशोक सपकाळे यांना औरंगाबाद खंडपीठात मिळालेल्या जामिनाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची परवानगी राज्य शासनाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने गृह विभागाला दिली आहे.

माजी महापौर सपकाळे व ढेकळे यांना औरंगाबाद खंडपीठातून जामीन मंजूर करण्यात आला होता. या दोघांचाही जिल्हा न्यायालयात पहिल्यांदा जामीन फेटाळल्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पुन्हा ढेकळे यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान न्यायालयाने त्यांचा तो अर्जदेखील फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मात्र त्या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता. औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यासाठी तपासाधिकारी पंढरीनाथ पवार व विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण या दोघांनी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या सहसचिवांनी राज्य शासनाच्या गृह विभागाला पत्र पाठवून तपासाधिकारी विशेष सरकारी वकिलांना सर्वोच्च न्यायालयात दोघांचे जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे.