आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिकेची कोंडी; गाळेधारकांना दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कोंडीत पकडण्यासाठी महापालिकेने डावपेच खेळायला सुरुवात केली आहे. महापालिकेने कामगार आयुक्तांनाच ‘व्यवसायाचे नूतनीकरण करू नये’ असे पत्र दिले आहे तर महापालिका-व्यावसायिकांच्या व्यक्तिगत वादात आम्ही महसूल का बुडवावा, असा प्रतिप्रश्न करीत कामगार आयुक्तांनी महापालिकेला लेखी उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाळेधारकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

डीआरटी कोर्टातील निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसे महापालिकेवरील संकटाचे ढग आणखी गडद होत आहेत. नोव्हेंबर महिन्यात गाळेधारक प्रदीप मंडोरा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून, शासनाने 20 फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.
गाळेधारकांनी प्रीमियमची रक्कम भरून नवीन करार करण्यास संमती द्यावी, यासाठी महापालिकेकडून नुकतेच पत्र कामगार आयुक्तांना देण्यात आले आहे.

चार मार्केटचे व्यापारी अपिलात
महापालिकेच्या सेंट्रल फुले मार्केट, जुने भिकमचंद जैन, भोईटे मार्केट, चौबे मार्केटमधील 134 व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपील दाखल केले आहे. भाडेकरू आहे की भोगवटाधारक, यावर 5 रोजी सुनावणी होईल.