आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका चौकशी अधिकारी वैद्यांची कामकाजातून माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सोनी समितीने हरकत नोंदवलेल्या माजी कामगार कल्याण अधिकारी मधुकर आळंदे यांची चौकशी 90 टक्के पूर्ण झालेली असताना चौकशी अधिकारी एस.एम.वैद्य यांच्याविरुद्ध होत असलेल्या आरोपांमुळे व्यथित होऊन त्यांनी चौकशीच्या कामातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच आयुक्तांना दिले आहे.

पदाचा दुरुपयोग करून बिले घेतल्याप्रकरणी ठपका असलेले व सात लाख 99 हजार 444 रुपये वसुलीचे आदेश असलेल्या माजी कामगार कल्याण अधिकारी मधुकर आळंदे यांच्याविरुद्ध तत्कालीन सोनी समितीने त्यांच्या पदोन्नतीबाबत आक्षेप नोंदवला होता. त्यांच्याविरुद्ध दोषारोप ठेवून महापालिकेत चौकशी प्रस्तावित केली आहे. याप्रकरणाची चौकशी एस.एम.वैद्य यांच्याकडे असून चौकशीचे काम अंतिम टप्प्यात आले असून 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. सत्ताधार्‍यांशी संबंधित असलेले आळंदे यांनी 10 डिसेंबर 2012 रोजी पत्र देऊन वैद्य यांच्यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. याबाबत वैद्य यांनी या चौकशीच्या कामातून मुक्तता करावी, असे निवेदन आयुक्तांना दिले आहे. यात वैद्य व क्लार्क वाणी यांच्यावर संगणमताचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरून ते भविष्यात आमच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कौटुंबिक जीवनात असुरक्षितता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वैद्य यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आयुक्तांनी योग्य आदेश देण्याची विनंती केली आहे. आधीच वैद्य यांची चौकशी अधिकारी म्हणून असलेली नेमणूक चुकीची असल्याचा आरोप होत असून त्यात वैद्य यांनी आळंदेंची चौकशी करण्यास दाखवलेली असर्मथता याबाबी चर्चेचा मुद्दा ठरत आहेत.