आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आम्ही बजावणार मतदानाचा हक्क’; पदाधिकार्‍यांनी घेतली शपथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी शहरातील विविध भागांमध्ये फिरून मतदार जागृतीसाठी प्रयत्न करणार आहेत. सर्व सदस्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब यांच्या वतीने रविवारी मतदार जागृती अभियानाचा शपथ घेऊन शुभारंभ झाला. या वेळी आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले उपस्थित होत्या. मतदानाच्या दिवसापर्यंत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी शहराच्या विविध ठिकाणी पाच मोठे होर्डिग्ज लावले जाणार आहे. या वेळी स्टीकर, हॅण्डबिल, पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ.राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन गनी मेमन यांनी केले. डॉ. दीपक पाटील यांनी आभार मानले. किरण राणे, सतीश सिंदाळकर, प्रशांत कोठारी, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सिकची, डॉ. छाबडा उपस्थित होते.

तज्ज्ञांची आज चर्चा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता गणपती हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘आम्हाला काय पाहिजे?’ याविषयावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला आहे.