आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादी पक्षामुळे जळगाव महापालिका निवडणुकीत मतांचे झाले विभाजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच 16 उमेदवारांना उभे करून निवडणुकीला सामोरे जाणार्‍या समाजवादी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र या निवडणुकीत पक्षाने काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नुकसान करण्यापर्यंत मजल मारली आहे.

साधारणपणे 10 महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी जळगाव शहरात पक्षाची कार्यकारिणी स्थापन करण्याच्या उद्देशाने दौरा केला. 5 नोव्हेंबरला त्यांनी मेहरूण भागातील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती हारुन नदवी यांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले. निवडणूक दृष्टिक्षेपात ठेवून आझमी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. केवळ मुस्लिम मतांवर विसंबून राहणे शक्य नसल्यामुळे हिंदू चेहर्‍यांना पदे देण्यात आली. उमेदवारी देतांनाही हिंदू-मुस्लिम भेदभाव करण्यात आला नाही. मात्र उमेदवारीसाठी दिग्गज चेहरे उपलब्ध न झाल्यामुळे नवख्या उमेदवारांना संधी मिळाली. आजमी यांनी नदवी यांच्यावर जबाबदारी दिली. नदवींनी मुस्लिम, झोपडपट्टी भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चांगले मुद्दे उपस्थित केले. मागे पडलेल्या भागांचा विकास करण्याबाबत त्यांच्या आश्वासनाला मतदारांनी साद दिली नाही. समाजवादी पक्षाने 16 जागांवर आपले नशीब अजमावले. पैकी पाच जागांवर यश मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. या पाच जागांच्या जोरावर सत्ताधार्‍यांच्या सोबत जाऊन विकासकामे करून घेणार असल्याचे नदवी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. उमेदवारांची ताकद वाढविण्यासाठी आझमी यांनी प्रचारार्थ तीन सभा घेतल्या. त्याचा परिणाम फारसा झाला नाही. परंतु पहिल्याच प्रय}ात सपाच्या 16 उमेदवारांनी मिळून सुमारे 12 हजार मते मिळविली. त्यांच्या उमेदवारांनी मिळविलेल्या मतांमुळे मुस्लिम मतांचे विभाजन झाले. याचा थेट परिणाम राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर झाला. या दोन्ही पक्षांची हक्काची मते खाणारा प्रमुख पक्ष म्हणून सपाची नवी ओळख निर्माण झाली.

आझमींचे भाषण वेगळय़ाच ट्रॅकवर
अबू आझमी यांनी तीन सभांमधून मतदारांना हाक दिली. आजमींचे भाषण विकासावर असायचे मात्र काही वेळातच त्यांच्या ट्रॅक बदलायचा. काही ठिकाणी त्यांच्या भाषणांमुळे तणाव निर्माण झाले. राष्ट्रवादी आणि सपाच्या उमेदवार, कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. त्याचाही विपरीत परिणाम निवडणुकीवर झाला.