आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळप्रकरणी तडजोड करण्याची महापालिकेची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव नगरपालिकेने 1999 मध्ये विमानतळ विस्तारीकरण करण्यासाठी मे. अँटलांटा इन्फ्रास्ट्रर मुंबई यांना मक्ता दिला होता. काम पूर्ण न झाल्याने मक्तेदार व पालिकेने एकमेकांविरुद्ध नुकसान भरपाईचे दावे दाखल केले होते. या प्रकरणात सद्या 18 जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली असून मक्तेदाराने तडजोडीची तयारी दर्शविली आहे. तडजोड करावी की नाही या बाबत शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार्‍या स्थायी समितीसमोर हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

विमानतळ विकास व विस्तारीकरण करण्यासाठी मक्तेदाराला 8.71 कोटींचे काम दिले होते. काम सुरू केल्यानंतर 2.64 कोटींचे काम पूर्ण केल्यावरही मक्तेदाराने पैसे वेळेवर मिळत नसल्याचे कारण पुढे करत काम बंद केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लवादक गाडगीळ यांची युक्ती करण्यात आली होती. लवादाकडे मक्तेदाराने 9.58 कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती तर पालिकेने 11.18 कोटींची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली होती.

दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मनपाने 6.59 कोटी मक्तेदारास द्यावे तर मक्तेदाराने 3.18 कोटी मनपास द्यावे, असा निर्णय दिला होता. हा निर्णय मान्य नसल्याने प्रशासनाने जळगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. या प्रकरणी दोन्ही पक्षात तडजोड करण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकरणी स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असल्याने शुक्रवारच्या सभेसमोर हा विषय ठेवण्यात आला आहे. यात काय निर्णय होतो, याबाबत अनेकांना उत्सुकता लागून आहे.