आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे कराराचा तिढा सुटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुदतसंपलेल्या गाळे कराराच्या मुद्यावरून सुरू असलेला तिढा साेडवण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे दिलेले प्रीमियम अाकारणीचे सूत्र बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात अाले. नवीन सूत्रानुसार २५०० गाळेधारकांना भाडेतत्त्वावर पुढील ३० वर्षांसाठी प्रीमियम अाकारणी केली जाणार अाहे. अडचणी अाल्यास पुढील तीन महिन्यांत याची अंमलबजावणी करणे शक्य अाहे. या रकमेतून हुडकाेचे कर्ज एकरकमी फेडण्याचे नियाेजन अाहे.
पालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात बुधवारी विशेष महासभा झाली. पीठासीन अधिकारी म्हणून महापाैर राखी साेनवणे हाेत्या. व्यासपीठावर उपमहापाैर सुनील महाजन, अायुक्त संजय कापडणीस, नगरसचिव निरंजन सैंदाणे हाेते. सभेच्या सुरुवातीला अायुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडील चर्चेचे इतिवृत्त वाचून दाखवले. कर्जफेडीसाठी निधी उभा करण्यासाठी महासभेला अधिकार दिले असल्याचे सांगून मुदत संपलेल्या गाळे कराराचा तिढा साेडवण्यासाठी ही सभा असल्याचे स्पष्ट केले. प्रीमियम अाकारणीसंदर्भात सुरुवातीला ढाेबळ कल्पना मांडून यावर नगरसेवकांच्या सूचना हरकती एेकून घेण्यात अाल्या. या चर्चेत नितीन लढ्ढा, सुरेश भाेळे, अश्विन साेनवणे, मिलिंद सपकाळे, अनंत जाेशी, अश्विनी देशमुख, अॅड. सुचिता हाडा, पृथ्वीराज साेनवणे, कैलास साेनवणे, वामनराव खडके यांनी सहभाग नाेंदवला. यानंतर व्यापाऱ्यांशी गटनेत्यांशी चर्चेसाठी वेळ मिळावा, म्हणून दुपारी वाजता सभा तहकूब करण्यात येऊन पुन्हा दुपारी वाजताची वेळ देण्यात अाली. दुपारच्या सत्रात कराराचे सूत्र सांगण्यात येऊन पुन्हा नगरसेवकांच्या सूचना स्वीकारत यात काही बदल करून अंतिम सूत्र मंजूर करण्यात अाले. या सूत्रानुसार मार्केटमधील गाळेधारकांना पुढील ३० वर्षांसाठी नवीन करार करून देण्यात येणार अाहे. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षित अाहे.
महासभेत गाळेधारकांशी चर्चा करताना अायुक्त संजय कापडणीस महापािलकेचे पदािधकारी.
मनपाची परिस्थिती, शासनाने दिलेली मुभा सर्वांशी चर्चेनंतर गाळे करारासंदर्भात मनपाने हे सूत्र ठरवले अाहे. दाेन वर्षांत केलेल्या विविध ठरावांना अालेल्या अडचणी पाहता गाळेधारकांसाठी ही शेवटची चांगली संधी अाहे. संजयकापडणीस, अायुक्त
*व्यावसायिक अव्यावसायिक मार्केटची वर्गवारी करून दिली जाणार सवलत.
*संभाव्य रेडी रेकनरनुसार पुढील ३० वर्षांमध्ये येणाऱ्या किमतीवर वार्षिक ते १२ टक्के भाडे निश्चिती.
*यानुसार येणारी भाडे रक्कम पािलका एकरकमी प्रीमियम म्हणून स्वीकारेल.
*एकरकमी प्रीमियम भरल्यास गाळेधारकांना ते टक्के सूट मिळेल.
*सर्व गाळ्यांचे सर्वेक्षण करून सद्य:स्थिती अािण स्थळानुसार ते २० टक्के इमारत घसारा निश्चिती.
*गाळेधारकांसाठी ठराव झाल्याच्या तारखेनंतर ३० वर्षांसाठी हा करार असेल.
*३ ते वर्षांनी १० ते १५ टक्के भाडे वाढीचा ठराव करण्यात येईल.
*प्रीमियम देण्यास विलंब किंवा हप्ते पाडल्यास व्याजाची अाकारणी.
*या व्यतिरिक्त १० रुपये चाैरस मीटरनुसार दरमहा नाममात्र भाडे घेणार.